दाक्षिण्यात सुपरस्टार प्रभासचा आगामी चित्रपट आदिपुरुष १६ जून पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जागतिक स्तरावर प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात प्रभास सोबतच २ मराठी कलाकार ही मुख्य भूमिका बजावताना दिसतायत. मुख्य म्हणजे या चित्रपटाचे दिगदर्शन मराठी दिगदर्शक ओम राऊत करत आहे तर प्रभू श्री राम यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटात प्रभू श्री राम यांच्या आयुष्यातील महत्वाची व्यक्ती म्हणजे हनुमंतराय. आदिपुरुष या चित्रपटात हनुमंतरायाची भूमिका मराठी अभिनेता देवदत्त नागे यांनी साकारली आहे.(Devdatta Nage Adipurush)
आज हनुमान जयंतीच्या निम्मित या चित्रपटातील देवदत्त साकारत असलेल्या भूमिकेचे पोस्ट प्रदर्शित करण्यात आले आहे. देवदत्त ने त्याच्या इंस्टाग्राम अकॉउंट वरून हे पोस्टर प्रदर्शित केला आहे. या पोस्ट मध्ये मारुतीराया साधनेला बसल्याचे दाखवण्यात आले तर मागे श्री राम यांची भूमिका साकारत असलेल्या प्रभासचा लुक देखील दाखवण्यात आलं आहे.
आज हनुमान जयंतीचे औचित्य सादत हे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.
हे देखील वाचा – वाॅकर घेऊन शंतनू मोघेंनी पार पडला प्रयोग…

त्याचा नुकताच आदिपुरुष ह्या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून चित्रपटाला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता त्यामुळे चित्रपटाच्या तारखेमध्ये थोडा बदल करण्यात आला असून या या चित्रपटाच्या काही सीन्समध्ये बदल करण्यात आल्याची बातमी देखील समोर आली या चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार आणि चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांनी नवरात्रीच्या शुभ मूर्तावर माता वैष्णोदेवीचे दर्शन घेत प्रेक्षकांच्या भेटीला 16 जून ला 3D मध्ये प्रदर्शित होंणार असल्याचे समजते.(Devdatta Nage Adipurush)
हे देखील वाचा – बदलणार पानिपतच्या लढाईकडे पाहण्याचा दृष्टिकोन युद्धानंतरची परिस्थती मांडणारा ‘बलोच’ या दिवशी होणार प्रदर्शित
आदिपुरुष या चित्रपटाला प्रचंड विरोध दर्शवण्यात आला. चित्रपटातील काही दृश्यांमुळे समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप काही घटकांकडून करण्यात आला होता. चित्रपटाचं दिगदर्शन मराठी दिगदर्शक ओम राऊत यांनी केले असून त्यामुळे मराठी दिगदर्शकाला पाठिंबा द्या म्हणून मनसे ने देखील आव्हान केले होते.