कलाकार मंडळी आजकाल बरेचदा ट्रोल होताना दिसतात. नेटकरी कलाकार मंडळींना ट्रोल करताना दिसतात यावर काही कलाकार मंडळी या ट्रोलिंगला सडेतोड उत्तर देताना दिसतात. तर काही नेटकरी या ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करतात. आजकाल कलाकार मंडळी ट्रोल होताच नेटकऱ्यांना सुनावताना दिसत आहेत. गायिका जुईली जोगळेकरही याआधी बरेचदा ट्रोल झाली. दरम्यान, जुईलीने नेटकऱ्यांच्या या ट्रोलिंगला वेळोवेळी उत्तरही दिलं आहे. ‘सारेगमप लिटल चॅम्प्स’ या लोकप्रिय रिऍलिटी शोमधून गायिका जुईली जोगळेकर घराघरांत पोहचली. याशिवाय जुईली रोहित राऊतबरोबरच्या लग्नामुळेही चर्चेत आली. (Juilee Jogalekar Answers To Trollers)
लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर जुईली व रोहित यांनी लग्नगाठ बांधली. सोशल मीडियावरही ही जोडी बरीच चर्चेत असते. नेहमीच काही ना ट्रेंडिंग रील व्हिडीओ शेअर करत ही जोडी चर्चेत असते. जुईलीने काही दिवसांपूर्वी रोहितबरोबरचा पारंपरिक अंदाजात फोटो शेअर केले होते. या फोटोवर नेटकऱ्यांनी जुईलीला म्हातारी म्हणत चिडवलं. तर काहींनी तिला दातांवरूनही हिणवलं. दरम्यान यावेळीही जुईलीने नेटकऱ्याला सडकून उत्तर दिलेलं पाहायला मिळालं.
सध्या सर्वत्र संजय लीला भन्साळी यांच्या हिरामंडी या वेबसीरिजची चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत आहे. या वेबसीरिजमधील गाणीही ट्रेंडिंगवर असल्याचं दिसतंय. अशातच जुईलीने या सीरिजमधील ‘एक बार देख लीजिए’ हे गाणं तिच्या सुमधुर आवाजात गात त्याचा सुंदर असा व्हिडीओ तिने सोशल मीडियावरुन पोस्ट केला. जुईलीने हा व्हिडीओ अगदी पेहरावात शूट केला होता. शिवाय तिच्या सुमधुर आवाजात गायलेल्या या गाण्याचं नेटकऱ्यांनी भरभरुन कौतुक केलेलं पाहायला मिळालं. दरम्यान तिच्या या व्हिडीओवर एका नेटकऱ्याने केलेल्या व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

जुईलीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्याने “दाताडी” अशी कमेंट करत तिला दातांवरून हिणवलं आहे. या नेटकऱ्याला जुईलीने चांगलंच उत्तर दिलेलं पाहायला मिळत आहे. “कसं जमतं स्वतःचं थोबाड लपवून दुसऱ्यांना बोलायला? कमाल आहे तुमची”, असं उत्तर जुईलीने दिलं आहे.