शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

रश्मिका मंदानाच्या ‘त्या’ व्हिडीओवर आदित्य ठाकरेंनी खोचक पोस्ट, म्हणाले, “यासाठी तिला पैसे…”

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 19, 2024 | 5:39 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Aditya Thackeray shared a sarcastic post on Rashmika Mandana Atal Setu video.

रश्मिका मंदानाच्या ‘त्या’ व्हिडीओवर आदित्य ठाकरेंनी खोचक पोस्ट, म्हणाले, “यासाठी तिला पैसे...”

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १२ जानेवारी रोजी मुंबईत अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू, या समुद्रावर बांधलेल्या देशातील सर्वात लांब पुलाचं उद्घाटन केलं. मुंबई ते नवी मुंबईला जोडणाऱ्या या पुलामुळे प्रवासादरम्यानचा खूप वेळ वाचतो. या अटल सेतूबदल अनेक मराठीसह अनेक हिंदी कलाकारांच्या  पोस्ट पहायला मिळाल्या होत्या. अशातच नुकताच दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाने या पुलावरून प्रवास केला आणि या प्रवासाबद्दलचा एक व्हिडीओ तिने शेअर केला आहे.

रश्मिकाने मुंबईतील अटल सेतू पुलाचे कौतुक करणारा एक व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर शेअर केला. तसेच या पुलाचे आणि तो तयार करणाऱ्या सरकारचे तोंडभरून कौतुक केले. रश्मिकाच्या या पोस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपल्या एक्स अकाऊंटद्वरे शेअर करत “’मला लोकांचं आयुष्य सुखकर बनवायला आवडतं” असं म्हणत तिचे कौतुक केले. देशाच्या पंतप्रधानांनी अभिनेत्रीचे कौतुक केले असले तर ती सोशल मीडियावर टीकेची धनी झाली आहे. तिच्या या व्हिडीओवर चाहते नाराज झाले असून तिला कमेंट्सद्वारे नकरात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

South India to North India… West India to East India… Connecting people, connecting hearts! 🤍 #MyIndia pic.twitter.com/nma43rN3hM

— Rashmika Mandanna (@iamRashmika) May 16, 2024

आणखी वाचा – अर्जुनच्या वहिनीकडून अप्पीचा अपमान, दोघांमधला कडूपणा अजूनही कायम, अमोल-अर्जुन यांची भेट नक्की कधी होणार?

अशातच आता यावर आदित्य ठाकरे यांनीही ट्वीट करत तिला सुनावलं आहे. आदित्य यांनी ट्वीट करत रश्मिकाच्याचं नाव न घेता असं म्हटलं आहे की, “मी आताच एका अभिनेत्रीचा व्हिडिओ पाहिला. ज्यात ती अटल सेतूची जाहिरात करताना दिसत आहे. (त्यासाठी कदाचित तिला पैसे दिले असतील.) जाहिरातीच्या शेवटी ती म्हणते, जागे व्हा आणि विकासाला मत द्या. जे की चांगलेच आहे. कारण याचा अर्थ भाजपला मत देऊ नका. अशा जाहिराती करण्याआधी वस्तुस्थिती तपासून घ्यावी, ही विनंती. कारण यातली काही तथ्ये चुकली आहेत.”

I just saw an actor suddenly make an advertisement (wonder if it’s paid for or not) on the MTHL, branded as Atal Setu by the current regime.

Some facts were missed:
• Atal Setu- MTHL’s 85% work was completed till June 2022, when our govt was toppled. The work happened during…

— Aaditya Thackeray (@AUThackeray) May 17, 2024

आणखी वाचा – “विमानातून फिरवण्याचे स्वप्न अधुरे राहिले पण…”, आईच्या आठवणीत छाया कदम भावुक, पोस्ट शेअर करत म्हणाल्या, “आज तू हवी होतीस…”

यापुढे आदित्य यांनी असं म्हटलं आहे की, “अटल सेतूचे ८५% काम हे जून २०२२पर्यंत पूर्ण झालं होतं, जेव्हा आमचं सरकार पाडण्यात आलं. हे काम महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालं. भाजपच्या नेतृत्वाखालील खोके सरकारने २०२२ ते २०२४ पर्यंत उर्वरित १५ टक्के पूर्ण केलं आणि ३ महिने उशिरा उद्घाटन केलं. कारण महत्वाच्या लोकांच्या तारखा मिळत नव्हत्या. मुंबईची प्रगती रोखून धरली”.

Tags: aditya thackerayentertainment newsrashmika mandana
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
20 may 2024 panchang mesh to meen rashi bhavishya see the details

मेष, वृषभ, कर्क राशीसह ‘या’ राशींसाठी सोमवार आर्थिक लाभाचा दिवस, तुमच्या नाशिबात नेमकं काय?, जाणून घ्या...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.