झी मराठी वाहिनीवरील मालिका प्रेक्षकांच्या चांगलेच मनोरंजन करत आहे. ‘पारू’, ‘शिवा’, ‘अप्पी आमची कलेक्टर’ यासह इतर मालिकादेखील प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. अशातच ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिकादेखील प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडत आहे. मालिकेत येणाऱ्या रंजक वळणांमुळे ही मालिका सध्या अव्वल ठरत आहे. या मालिकेत अक्षरा, अधिपती, भुवनेश्वरी, चारूहास, सरगम या पात्रांचा अभिनय पाहणंही रंजक ठरत आहे. मालिकेत येणाऱ्या रंजक वळणांमुळे ही मालिका अधिक जोरात सुरु आहे.
सध्या मालिकेत अधिपतीच्या गाणं शिकण्याचा प्रवास सुरु आहे. अधिपतीला गाणं शिकवण्यासाठी सरगम मॅडमना भुवनेश्वरी घेऊन येते. मात्र ही तिची चाल असते. अधिपतीच्या गळ्यात पडून त्याला अक्षरापासून लांब करण्यासाठी भुवनेश्वरी सरगमला पैसेही देते. एकीकडे सरगम शिकवणी सोडून अधिपतीच्या जवळ जाण्याचा, त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे अधिपती व अक्षरा यांच्यातील प्रेम बहरतनाचेही पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा – Video : चक्क विमानाने आंबे घेऊन आला सुप्रसिद्ध मराठी अभिनेता, म्हणाला, “कोकणातील शान आहे म्हणून…”
काही दिवसांपासून मालिकेत अधिपती व अक्षरा यांच्यातील प्रेम अधिक फुलून येत असल्याचे पाहायला मिळत आहे. मालिकेत सरगम मॅडममुळे अक्षराला अधिपतीविषयी असुरक्षितता वाटत आहे. यामुळे अक्षरा अधिपतीला प्रेमाने जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. अशातच मालिकेचा एक नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यामध्ये अक्षरा अधिपतीला फोन करून “आपण रंकाळ्याला जायचं का” असं विचारते. “तुम्हाला वेळ असेल तरच आपण जाऊ’ असं म्हणते. यावर अधिपतीही “काही हरकत नाही. तुमची कामे झाली की मला फोन् करा. आपण लगेच जाऊ” असं म्हणतो. या व्हिडीओमध्ये दोघांचा रोमॅंटिक अंदाज पहायला मिळत आहे.
या प्रोमोला प्रेक्षकांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. दरम्यान, अक्षरा-अधिपती यांच्यातील हे संभाषण प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडत असून मालिकेत चालू असलेले कथानकही त्यांना चांगलेच आवडत आहे. त्यामुळे मालिकेत आता पुढे काय पाहायला मिळणार? भुवनेश्वरीच्या इच्छेप्रमाणे अधिपती-अक्षरा वेगळे होणार का?, की त्यांचे प्रेम यावर मात करणार का? हे आगामी भागांमध्ये पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.