‘ठरलं तर मग’ मालिकेत असं पाहायला मिळणार आहे की, मधुभाऊंच्या जीवाला जेलमध्ये धोका आहे हे जेव्हा सायलीला कळतं तेव्हा ती खूप घाबरते आणि मधुभाऊंची काळजी वाटत असल्याचं सांगते. पण अर्जुन व मधु भाऊ दोघेही तिला धीर देतात. तर इकडे महिपत पोलिसांच्या मदतीने पुन्हा एकदा आपल्या माणसाला जेलमधूनच फोन लावतो. मधु भाऊंचा काटा काढायला जेलमध्ये त्याला कोण मदत करू शकेल याची यादी तो त्या माणसाला काढायला सांगतो. त्यानंतर मधुभाऊंबरोबर ज्या माणसाला त्यांच्या सेलमध्ये पाठवला आहे तो माणूस अजून काय करत नाही आहे हे पाहायलाही तो पोलिसांना सांगतो. (Tharal Tar Mag Serial Update)
अर्जुन मधुभाऊंना सांगतो की महिपत तुमच्यावर लक्ष ठेवून आहे त्यामुळे तुम्ही सावध राहा. तुम्ही त्याच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवा. त्याच्या वागण्यात थोडा तरी बदल दिसून आला तर पोलिसांना सांगा ते मला लगेच सांगतील. तर एकीकडे प्रियाने साक्षीला चैतन्य अर्जुनला भेटला असल्याचं सांगते. तेव्हा साक्षी अर्जुनला फोन करते पण तो फोन उचलत नाही. तितक्यात तो घरी येतो तेव्हा साक्षी त्याला कुठे गेला होतास असा जाब विचारते. सायली इतक्या कॉन्फिडंटने विचारते म्हणजे तिला कसला तरी संशय आला असणार हे चैतन्यला जाणवतं म्हणून तो अर्जुनला भेटायला गेला असल्याचं खरं सांगतो.
चैतन्य साक्षीला म्हणतो, “मी तुझा वकील आहे त्यामुळे मला या केससंदर्भात त्याला भेटणं गरजेचं आहे. दोन वकील जसे एकमेकांना भेटतात तसं कॅज्युअल मीटिंग होती. मी तुला नेलं असतं तर त्याने तुझा अपमान केला असता ते मला सहन झालं नसतं त्यामुळे मी तुला काही बोललो नाही. चैतन्यच बोलणं ऐकून साक्षीला तो खरं बोलत असल्याचा भास होतो. तर सुभेदारांचा घरी कल्पना सायली अर्जुनच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला सरप्राइज द्यायचं ठरवते. यावर पूर्णा आजी व अस्मिता नकार देतात.
अर्जुनला खूप वाईट वाटत असतं. तो सायलीला बोलतो की, मधुभाऊ सुटेपर्यंत आपण हे कॉन्ट्रॅक्ट सुरु ठेवू असं ठरलं आहे ना. सायलीचं म्हणणं असतं की, ते मी नाही तुम्ही ठरवलं. अजून किती दिवस आपण यांना फसवणार आहोत. आता बस झालं आपल्याला काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल. त्यासाठी आपल्याला एकमेकांपासून अंतर ठेवणंच योग्य ठरेल.