बॉलिवूड सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपलपैकी एक जोडी म्हणजे अभिनेत्री कतरिना कैफ व अभिनेता विकी कौशल. लग्नाआधी दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल कोणालाही कळू दिले नाही. पण लग्नानंतर एकमेकांवरचे प्रेम व्यक्त करण्यात त्यांनी अजिबात मागेपुढे पाहिलं नाही. नुकताच विकी कौशलचा वाढदिवस अगदी दणक्यात साजरा केला. यावेळी अभिनेत्री कतरिनाने रात्री उशिरा पोस्ट शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यामुळेअभिनेत्रीच्या गरोदरपणाची चर्चा पुन्हा एकदा रंगलेली पाहायला मिळाली. (katrina kaif Pregnancy Rumours)
कतरिना व विकी कौशलच्या लग्नाला तीन वर्षे पूर्ण होणार आहेत. डिसेंबर २०२४ मध्ये त्यांच्या लग्नाला तीन वर्षे पूर्ण होतील. या तीन वर्षात अनेकदा अभिनेत्री प्रेग्नंट असल्याच्या बातम्या आल्या आहेत. पण प्रत्येक वेळी या बातम्या अफवा असल्याचं समोर आलं. आता विकीच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्रीने तीन फोटो पोस्ट केले आहेत. याशिवाय कॅप्शनमध्ये ३ व्हाईट हार्ट देत ३ केकचे फोटो पोस्ट केले आहेत.
या तीन फोटो पोस्ट, तीन केकमुळे नेटकरी अनेक अंदाज बांधताना दिसत आहेत. या तिच्या पोस्टवरुन अभिनेत्री गर्भवती आहे की काय अशी चर्चा सुरु आहे. कतरीना व विकी त्यांच्या मुलाची केव्हा गुडन्यूज देणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. कतरिना सध्या लंडनमध्ये आहे आणि अलीकडे विकी तिला भेटायलाही आला होता. तेव्हा ती त्याच्याबरोबर मुंबईला आली नव्हती. अभिनेत्रीने शेअर केलेले फोटो तिथल्या एका रेस्टॉरंटमधील आहेत.
आता नेटकरी असा दावा करत आहेत की, अभिनेत्री गरोदर आहे आणि हे जोडपे हे सत्य लपवत आहेत. त्यामुळे कतरिना लंडनमध्ये आहे. एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, “हे तीन केक आणि तीन हृदय का वापरले गेले?, जणू ती कुटुंबातील तिसऱ्या सदस्याची चाहूल दर्शवित आहे”. तर आणखी एकाने लिहिले आहे की, “ती निश्चितपणे प्रेग्नंट आहे”.तर एकाने लिहिले आहे की, “३-३-३ म्हणजे काय कनेक्शन?”. सध्या कतरीनाकडे कोणताही प्रोजेक्ट नाही पण विकी ‘छावा’ आणि ‘बॅड न्यूज’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे.