‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमाने प्रेक्षकांची मनावर अधिराज्य गाजवलं. गेल्या नऊ वर्षांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या कार्यक्रमामध्ये काम केलेल्या प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. या कार्यक्रमातून श्रेया बुगडे, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, भाऊ कदम, अंकुर वाढवे, स्नेहल शिदम या कलाकारांनी त्यांच्या हास्यविनोदाने अक्षरशः धुमाकूळ घातला. या कार्यक्रमातून अभिनेता भाऊ कदमला विशेष लोकप्रियता मिळाली. (Shreya Bugade and Bhau Kadam)
भाऊ कदमने आजवर त्याच्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. भाऊ कदम यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीपासूनच संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवले. निरागस चेहरा, उत्तम अभिनय आणि विनोदाचे अचूक टायमिंग यामुळे त्यांनी या कार्यक्रमाची शान जपली. त्यांच्या सुपरहिट अभिनयामुळे त्यांनी मराठीमध्ये अनेक चित्रपटांमध्येही काम केलेले दिसून आले आहेत. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामुळे भाऊला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली.सोशल मीडियावरही भाऊ बऱ्यापैकी सक्रिय असतो.

तर या कार्य्रक्रमातून अभिनेत्री श्रेया बुगडेही घराघरांत पोहोचली. श्रेयाने आजवर तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. श्रेयाचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहतावर्ग आहे. श्रेयाने आजवर त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. सोशल मीडियावरुन श्रेया नेहमीच काही ना काही शेअर करत असते. अशातच श्रेयाने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेल्या एका स्टोरीने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
या स्टोरीमध्ये श्रेयाबरोबर भाऊ कदमही दिसत आहेत. विमानात बसलेला हा त्यांचा फोटो आहे. दोघेही लंडन येथे जात असल्याचं फोटोवरुन कळत आहे. श्रेयाच्या आधीच्या स्टोरीमध्ये मेधा मांजरेकर व मृणाल कुलकर्णीही दिसत आहेत. त्यावरुन श्रेया व भाऊ एखाद्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला जात असतील का असा प्रश्न पडला आहे.