बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची नवीन वेबसीरिज ‘हिरामंडी : द डायमंड बाजार’ सध्या खूप चर्चेत आहे. या सीरिजमधील सर्व पात्रांना प्रेक्षकांकडून खूप पसंती मिळाली. अभिनेता शेखर सुमन यांनी खूप कालावधीनंतर अभिनयक्षेत्रात पुनरागमन केले आहे. शेखर यांनी यामध्ये जुल्फीकार ही नवाबाची व्यक्तीरेखा साकारली आहे. या सीरिजमधील त्यांचा ओरल सेक्सच्या सीनची चर्चा खूप झाली. त्याबद्दल त्यांनी आता खुलासा केला असून यावर त्यांनी सविस्तर सांगितले आहे. (shekhar suman on oral sex scene)
शेखर यांनी या सीरिजमध्ये मल्लिकाजान म्हणजे मनीषा कोइरालाच्या समोर ओरल सेक्सचा सीन करायचा होता. हा सीन चित्रित झाल्यानंतर त्यांची पत्नी त्यांना काय म्हणाली याबद्दल एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे. ‘पिंकविला’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, “मी काय करुन आलो आहे हे मी माझ्या पत्नीला सांगू शकलो नाही. मी जेव्हा घरी परतलो तेव्हा तिने मला विचारले की तुम्ही सेटवर काय करुन आला आहात पण तुम्ही मला याबद्दल सांगत नाही आहात. त्यावर मी तिला म्हणालो की मी जे काही करुन आलो आहे ते सांगण्यासारखे नाहीच आहे पण ते बघण्यासारखेही नाही आहे. त्यामुळे जे आहे ते वेबसीरिजमध्ये पाहा”.
याआधीही या वेबसीरिजच्या निमित्ताने झालेल्या मुलाखतीमध्ये शेखर यांनी या सीनबद्दल अनेकदा भाष्य केले आहे. त्यांनी सांगितले की, “तुम्ही कोणत्याही दृश्याचे चित्रीकरण महत्त्वाचे असते. हा सीन मी एका टेकमध्ये शूट केला होता. जीवनात काहिही अशक्य नसते, त्यामुळे मी हा सीन करेन आणि शेवटी हा सीन झालाच. या सीनमधून नवाबाची दयनियता देखील दिसून येते. त्यामुळे हे सर्व समजून करणे खूप महत्त्वाचे होते”.
सध्या ही सीरिज नेटफ्लिक्सवर पाहायला मिळत आहे. यामध्ये मनीषा कोइराला, सोनाक्षी सिन्हा, रिचा चढ्ढा, संजीदा शेख, अदिती राव हैदरी, शर्मिन सहगल मेहता,फरीदा जलाल,अध्ययन सुमन हे कलाकार प्रमुख भूमिकेमध्ये आहेत.