‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून अनेक कलाकार मंडळी घराघरांत पोहोचले. या कार्यक्रमातून कलाकार मंडळींनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं. या कार्यक्रमातून अभिनेता निखिल बने घराघरांत पोहोचला. निखिल हा मूळचा कोकणातील आहे. विनोदाचं अचूक टायमिंग साधत हास्यजत्रेतून निखिलने सर्वांनाच भुरळ घातली आहे. सोशल मीडियावरही निखिल बऱ्यापैकी सक्रिय असतो. नेहमीच तो काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. विशेषतः तो त्याचं गावावरील प्रेम सोशल मीडियावर व्यक्त करताना दिसतो. (Nikhil Bane Kokan Trip)
निखिल बनेचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियावरून निखिल नेहमीच काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असतो. विशेषतः गावाकडच्या आठवणी तो चाहत्यांबरोबर शेअर करत असतो. अशातच निखिलने शेअर केलेल्या एका व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. निखिल हा चिपळूणचा आहे. गावात असणाऱ्या पूजेनिमित्त निखिल पुन्हा एकदा त्याच्या कोकणातील घरी पोहोचला होता. यावेळचा एक खास व्हिडीओ त्याने इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये असं पाहायला मिळत आहे की, निखिल मुंबईहून कोकणात जाणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेसने गावी पोहोचला. कोकणात जाणाऱ्या गाड्यांमध्ये नेहमीच गर्दी असते. तशीच गर्दी निखिलला यावेळी मिळाली. जनशताब्दीतून उतरल्यावर रेल्वेस्टेशनवर घ्यायला त्याला नातेवाईक गाडी घेऊन आले होते. सध्या सर्वत्र गरमी सुरु असल्याने वाटेत उकाड्यामुळे गावच्या आंब्याचा रस ते प्यायले. पूजेसाठी गेलेल्या निखिलचा हा प्रवास त्याने या व्हिडीओमधून दाखवला आहे.
शिवाय त्याने या व्हिडीओमध्ये जेवण बनवताना तसेच जेवणाची पंगत, गावचं भजन याची झलक दाखविली आहे. याशिवाय निखिलला यंदाचा पहिला पाऊस गावी कोकणात अनुभवायला मिळाला. नुकत्याच शेअर केलेल्या कोकणातील गावच्या व्हिडीओवर निखिलने ‘पुन्हा चिपळूण प्रवास’ असं लिहिलं आहे. कारण, काही दिवसांपूर्वीच अभिनेता गावी जाऊन आला होता. त्यावेळीही त्याने गावी जाताना एसटीने प्रवास केला होता. तो व्हिडीओही त्याचा चर्चेत आलेला पाहायला मिळाला.