बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान ही वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमी चर्चेत राहिली आहे. साराचे आई-वडील सैफ अली खान व अमृता सिंह यांच्या नात्याबद्दल व्यक्त होतानाही ती दिसते. मनोरंजन क्षेत्रात साराला येऊन सहा वर्ष पूर्ण झाली आहेत. आपल्या अभिनय व सौंदर्याने मनोरंजन क्षेत्रांमध्ये एक वेगळी जागा निर्माण केली आहे. साराची आजी शर्मिला, आई-वडील हे सगळे जण मनोरंजन क्षेत्रातीलच ओळखीचे व सुप्रसिद्ध चेहरे आहेत. सैफ व अमृता यांचा घटस्फोट झाल्यापासून सारा व ईब्राहिम ही दोन्ही मुलं अमृताजवळच राहतात. (sara ali khan on sharmila tagore)
सारा ही सैफची मोठी मुलगी आहे. पण आजी शर्मिलाबरोबर तिची जोडी जास्त जमते. साराने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये अमृता व शर्मिला यांच्या नात्यावर भाष्य केले आहे. तिने सांगितले की, “माझ्या आईचे आई-वडील या जगात नाहीत. पण उद्या जर मला किंवा ईब्राहिमला काही झालं तर ती एकटी नसणार. माझी मोठी आई म्हणजेच आजी शर्मिला आईबरोबर असणार आहे. तसेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे”.
तसेच सोशल मीडियावरील अनेक गोष्टींवर तिची व शर्मिला यांची चर्चा होत असते. तसेच याबद्दल शर्मिला यांचे मार्गदर्शनदेखील घेते. त्यांनी नम्रतेने वागायला शिकवले. तसकह प्रत्येक गोष्टीमध्ये संतुलन कसे साधायचे? हे देखील शिकवले. एक अभिनेत्री म्हणूनच नाही तर एक चांगली वीळती कशी होता येईल? हे आजीने योग्य पद्धतीने शिकवले असल्याचेही सांगितले आहे.
साराच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर ती ‘मर्डर मुबारक’ या चित्रपटामध्ये दिसून आली होती. तसेच तिचा ‘ए मेरे वतन’ या चित्रपटाला देखील खूप पसंत केले गेले. तसेच शर्मिला टागोर या २०२३ साली ‘गुलमोहर’ या नाटकामध्ये दिसून आल्या होत्या. या नाटकात मनोज वाजपेयी यांची महत्त्वाची भूमिका होती.