आपल्या आगळ्यावेगळ्या वागणुकीने नेटकाऱ्यांचं कायमच लक्ष वेधून घेणारी बॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन’ नुकतीच तिच्या आजारपणाबद्दलच्या वृत्तामुळे चर्चेत आली आहे. राखी सावंत हृदयाच्या गंभीर आजाराने ग्रस्त असल्याचे वृत्त येताच तिच्याअ चाहत्यांमध्ये खळबळ उडाली. राखी सावंतला अचानक रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. तिच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.
छातीत तीव्र वेदना होत असल्याच्या तक्रारीनंतर मंगळवारी रात्री तिला मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. आशातच आज राखीचा पूर्व पती रितेश कुमारने तिच्या प्रकृतीबद्दलची माहिती देत मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्याने राखीच्या अँजिओग्राफीची तयारी सुरू असल्याचे सांगितले. तसेच राखीची प्रकृती अजूनही गंभीर असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर राखी लवकर बरी व्हावी यासाठी चाहत्यांनाही रितेशने आवाहन केले आहे.
नवभारतच्या वृत्तानुसार, राखी सावंतच्या तब्येतीची माहिती देत रितेश कुमार असं म्हणाला की, “राखीच्या छातीत तीव्र वेदना होत असल्याने तिला रुग्णालयात दाखल केले. तिची प्रकृती अजूनही गंभीर आहे. काल रात्रीपासून आम्ही हॉस्पिटलमध्ये आहोत. काल रात्रीपासून त्यांच्या छातीत तीव्र वेदना होत होत्या. तिला तीव्र वेदना होत आहेत आणि हात वर करणेदेखील तिला शक्य होत नव्हते. तसेच, त्याच्या छातीच्या मध्यभागी वेदना होत आहे”.
आणखी वाचा – राखी सावंत रुणालयात दाखल, उपचारादरम्यानचे फोटो व्हायरल, नेमकं झालं तरी काय?
यापुढे रितेशला राखीला हृदयविकाराचा झटका आला होता का? याबद्दल विचारण्यात आले. यावर त्याने असं म्हटलं की, “याबद्दल फक्त डॉक्टरच सांगू शकतील. आम्ही डॉक्टरांशी सतत बोलत आहोत, परंतु अद्याप कोणताही एकत्रित अहवाल (रिपोर्ट) समोर आलेला नाही. तिचा ईसीजी व इको या चाचण्या करण्यात आल्या असून आता तिच्या अँजिओग्राफीची तयारी सुरू आहे”.
आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री देत आहे गंभीर आजाराला मात, व्हिडीओद्वारे दाखवली अवस्था, आता कशी आहे प्रकृती?
यापुढे रितेशने राखीची प्रकृती आता गंभीर असल्याचे म्हटले असून तिने तिच्या पोटातील काही समस्यांबद्दलही सांगितले आहे. तिच्या पोटात बॉल आहे. तसेच तिच्या गर्भाशयात काहीतरी असल्यामुळे डॉक्टरांनी कॅन्सर तपासण्यासाठी पाठवले असल्याचेही यावेळी रितेशने सांगितले आहे. त्यामुळे राखीच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.