आपल्या आगळ्यावेगळ्या वागणुकीने नेटकाऱ्यांचं कायमच लक्ष वेधून घेणारी बॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन’ म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री म्हणजे राखी सावंत. आपल्या अनोख्या अंदाजाने सोशल मीडियावर चर्चेत राहणाऱ्या राखी सावंत बद्दल नुकतीच एक माहिती समोर येत आहे. राखी सावंत हृदयाच्या गंभीर आजाराने ग्रस्त असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे राखी सावंतला अचानक रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. तिच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. राखी सावंतचे रुग्णालयातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
राखी सावंत हृदयाच्या आजाराने ग्रस्त असल्याचे या पोस्टद्वारे म्हटले जात आहे. त्यामुळे तिला मुंबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राखी सावंतचे रुग्णालयातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात राखी सावंत बेडवर झोपलेली दिसून येत आहे. काही फोटोंमध्ये तिच्या हातावर सलाईन लावलेलं दिसत आहे. एका फोटोमध्ये नर्स तिचं बीपी चेक करताना दिसत आहे.
आणखी वाचा – ‘मेष’ व ‘मीन’ राशीसाठी बुधवार ठरणार लाभदायक, नोकरीत मिळणार बढती, आणखी कुणाचे नशीब उजळणार?, जाणून घ्या…
पापराझी विरल भयानीने राखी सावंतचे रुग्णालयातील काही फोटो सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत आणि या फोटोखाली असं म्हटलं आहे की, “राखी सावंतला हृदयाच्या आजारामुळे लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राखी सावंतच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी. आता तिचा क्रेझीनेस पाहण्याची उत्सुकता आहे”. राखीच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.
राखी सावंत अनेकदा तिच्या मस्तीच्या अंदाजामुळे अनेकांची मस्करी करत असते. त्यामुळे तिच्या या फोटोमुळे तिला खरंच काही झालं आहे की, हासुद्धा तिचा एक स्टंटच आहे, असं म्हटलं जात आहे. त्यामुळे राखीच्या या फोटोखाली अनेकांनी तिला बरे होण्यासाठी सदिच्छा दिल्या आहेत तर काहींनी मात्र तिचा हा स्टंट असल्याचं म्हटलं आहे.