बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर ही नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमी चर्चेत असते. करीना सैफ अली खानबरोबर २०१२ साली लग्नबंधनात अडकली. त्यानंतर २०१६ साली तिने तैमुरला जन्म झाला. ती गरोदर असताना एक पुस्तक लिहिले होते. यामध्ये गरोदरपणातील सर्व गोष्टींबद्दल चर्चा करण्यात आली होती. या पुस्तकाचे नाव तिने ‘करीना कपूर खान्स प्रेग्नन्सी बायबल : द अल्टीमेट मॅन्युअल फॉर मॉम्स टू-बी’ असे होते. पण या नावावरुनच ती कायदेशीर कचाट्यात सापडली आहे. (kareena kapoor court case)
करीनाने पुस्तकाला जे नाव दिले आहे त्यावरून ख्रिश्चन धर्माच्या भावना दुखावल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणात प्रेग्नन्सी पुस्तकावर बंदी घालण्यात यावी किंवा नाव बदलण्यात यावे अशी मागणी केली जात आहे. वकील ख्रिस्तोफर अॅथनी यांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये धर्माच्या भावना दुखावल्या गेल्याचे सांगितले आहे. या याचिकेत सांगितले की पुस्तकाच्याशिर्षकामध्ये ‘बायबल’ या शब्दाचा वापर केला. निव्वळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी हा शब्द वापरला गेला आहे असेही म्हणण्यात आले आहे.
या प्रकरणी करीनाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणाची पुढील सुनावणी १ जुलै रोजी होणार आहे. जबलपुर येथे राहणाऱ्या व्यक्तीने सुरुवातीला स्थानिक पोलिस स्थानकामध्ये तक्रार दाखल केली होती. त्यांनी तक्रारीमध्ये लिहिले की, “पुस्तकाच्या शीर्षकामुळे ख्रिश्चन धर्माच्या भावना दुखावल्या आहेत. बायबल या पवित्र ग्रंथाची तुलना अभिनेत्रीच्या प्रेग्नन्सी पुस्तकाशी करण्यात आली आहे”.
पोलिसांनी या प्रकरणातील तक्रार घेण्यास नकार दिला. त्यानंतर अॅथनी यांनी माजिस्ट्रेट न्यायालयाकडे वळले. तेथेदेखील बायबल या शब्दाने इसाई धर्माच्या भावना कशा दुखावल्या? हे सिद्ध न झाल्याने त्यांची याचिका नाकारण्यात आली. त्यानंतर त्यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. पण तेथेदेखील त्यांची याचिका नाकारण्यात आली होती. आता पुन्हा सुनावणी होणार असून आता निकाल काय लागणार? याकडे लक्ष लागले आहे.