शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“भुवनेश्वरीकडून हे अपेक्षित नाही”, अधिपतीचा संसार मोडण्यासाठी भुवनेश्वरीची धडपड, मालिकेच्या कथेवर प्रेक्षक नाराज, म्हणाले, “इतका आईवडा…”

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 8, 2024 | 6:35 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tula Shikvin Changlach Dhada serial new promo audience expressed their displeasure by comments

“भुवनेश्वरीकडून हे अपेक्षित नाही”, अधिपतीचा संसार मोडण्यासाठी भुवनेश्वरीची धडपड, मालिकेच्या कथेवर प्रेक्षक नाराज, म्हणाले, “इतका आईवडा...”

झी मराठी वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. मालिकेला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. कथानकात येणाऱ्या रंजक वळणामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडत आहे. या मालिकेतील अक्षरा व अधिपती या जोडीलाही प्रेक्षकांची चांगलीच लोकप्रियता मिळत आहे. अशातच मालिकेत अक्षरा व अधिपती यांच्या प्रेमात विरजण टाकायला एका पात्राची एन्ट्री झालेली पाहायला मिळत आहे. भुवनेश्वरीने नवी चाल आखत अक्षरा व अधिपतीच्या संसारात मिठाचा खडा टाकण्यासाठी सरगमला आणलं आहे.

नुकताच मालिकेचा एक नवीन प्रोमो प्रदर्शित करण्यात आला, ज्यामध्ये भुवनेश्वरी सरगमला अधिपती व अक्षरा व अधिपती यांचे लग्न मोडण्यास सांगते. या व्हिडीओमध्ये भुवनेश्वरी तिला असं म्हणते की, “तुला अधिपतीला प्रेमात पाडायचं नाही, तर त्या दोघांचे लग्न मोडणे हा आमचा उद्देश आहे.” दरम्यान, या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत त्यांना हा नवीन ट्विस्ट आवडत  नसल्याचे म्हटले आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – अखेर सात वर्षांनी अर्जुन-अप्पी आले समोरासमोर, अमोल आपला मुलगा असल्याचं सत्य अर्जुनसमोर येणार का?, पुढे काय घडणार?

या व्हिडीओखाली कमेंट करत एकाने असं म्हटलं आहे की, “बकवास मालिका, अधीपती वेडा वाटतोय आता.. बंद करा ही मालिका आता.” तर आणखी एकाने असं म्हटलं आहे की, “संगीत शिकवणे म्हणजे सरस्वतीची आराधना करणे असते. शिकवायच्या नावाखाली फालतू धंदे करायला लावणे ते पण भुवनेश्वरी बाईकडून अपेक्षित नाही” तर आणखी एकाने “आधी ही मालिका चांगली होती पण आता ही मालिका बघणे आम्ही बंद केले आहे” असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने अधिपतीविषयी “इतका आईवेडा कुणीही नसतो. अधिपतीला स्वत:ची बुद्धी नाही का?” अशी कमेंट केली आहे.

आणखी वाचा –

आणखी वाचा – ‘Respect ही मोठी गोष्ट असते”, हास्यजत्रा सोडण्यावरून सुनावणाऱ्यांना गौरव मोरेचं सडेतोड उत्तर, म्हणाला, “शो का सोडला याचा विचार…”

या व्हिडीओला काही चाहत्यांनी कमेंट्सद्वारे नापसंती दर्शवली आहे तर काहींना हा नवीन ट्विस्ट आवडत असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, येत्या भागात सरगम मॅडम अधिपतीला त्यांच्या प्रेमात जाळ्यात ओढणार का? भुवनेश्वरीच्या इच्छेप्रमाणे अधिपती व अक्षरा यांचे लग्न मोडण्यात ती यशस्वी होणार का? तसेच भुवनेश्वरीने सांगितलेलं कार्य सरगम पार पाडू शकेल का? हे पाहण्यासाठी प्रेक्षक चांगलेच आतुर आहेत. त्यामुळे आगामी भागांसाठी प्रेक्षक कमालीचे उत्सुक आहेत.  

Tags: marathi entertainment newsMarathi Serial Newstula shikvin changlach dhada
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
actress shilpa shinde broke wedding

साखरपुडा झाला, पत्रिकाही छापल्या अन्...; सासरी जाण्यापूर्वी सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने मोडलं होतं स्वतःचं लग्न, कारण...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.