रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

हुबेहूब कालकेय! गौरव मोरेच्या नव्या लूकची रंगलीय चर्चा, नेटकऱ्यांनी अभिनेत्यासह मेकअप दादांचंही केलं कौतुक, म्हणाले….

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 5, 2024 | 11:30 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Gaurav More Viral Look

हुबेहूब कालकेय! गौरव मोरेच्या नव्या लूकची रंगलीय चर्चा, नेटकऱ्यांनी अभिनेत्यासह मेकअप दादांचंही केलं कौतुक, म्हणाले….

कलाकार मंडळींचे एखादे पात्र हे विशेष गाजतं. एखादं पात्र रंगवताना ही कलाकार मंडळी स्वतः जीव ओतून काम करताना दिसतात आणि त्या मागची मेहनत मात्र फार कमी जणांना ठाऊक असते. ते पात्र अगदी हुबेहूब उमटवण्यासाठी ही कलाकार मंडळी जीवाचं रान करत आपलं शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करतात. ते पात्र जशास तसे दिसावं म्हणून मेकअप दादांचा ही त्यात खारीचा वाटा असतो. ती भूमिका लक्षात घेऊन कलाकाराला त्यानुसार तयार करणे हे महत्त्वाचं काम ही मेकअप दादा मंडळी करत असतात. सध्या एक पात्र सोशल मीडियावर विशेष गाजताना दिसत आहे आणि त्या पात्राचं कौतुक होता होता आता मेकअप दादांचंही कौतुक होताना पाहायला मिळत आहे. (Gaurav More Viral Look)

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेल्या गौरव मोरेने आजवर प्रेक्षकांच्या मनात घर केलं. गौरवने त्याच्या विनोदी अंगानं नेहमीच प्रेक्षकांची मन जिंकली. या कार्यक्रमानंतर आता गौरव ‘मॅडनेस मचाऐंगे’ या हिंदी विनोदी कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या कार्यक्रमातून अल्पावधीतच गौरवने प्रेक्षकांची मन जिंकली. सोशल मीडियावरही गौरव बऱ्यापैकी सक्रिय असतो. अशातच आता गौरवने सोशल मीडियावरून शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. गौरवने यावेळी ‘बाहुबली’ या सुप्रसिद्ध चित्रपटात मुख्य भूमिकांबरोबर खलनायकाची म्हणजे ‘कालकेय’ची गाजलेली भूमिका साकारली.

आणखी वाचा – हरिशबरोबर लग्नाला तयार होईल का पारू?, अहिल्यादेवींनी मुलाची निवड करताच आदित्यच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला

View this post on Instagram

A post shared by Gaurav More (@im_gaurav_more20)

ही भूमिका साकारताना तो अगदी हुबेहूब कालकेयच्या भूमिकेत शिरलेला पाहायला मिळाला. मात्र या भूमिकेसाठी त्याला मेकअप दादांनी अगदी हुबेहूब तयार केले असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे गौरवच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट करत त्याचं व त्याच्या मेकअप दादांच कौतुक केलेलं पाहायला मिळत आहे. मोठे केस, शरीरावर सांडलेले रक्त, मार लागल्याच्या खुणा, एक खोटा डोळा अशा कालकेयच्या पेहरावात गौरव पाहायला मिळाला.

आणखी वाचा – कर्क राशीच्या लोकांना नोकरीमध्ये मिळणार यश, तर कुंभ राशीच्या लोकांना व्यवसायात मिळेल यश, जाणून घ्या…

गौरवच्या या लूकवर नेटकऱ्यांनी भरभरून कमेंट करत त्याचं कौतुक केलं आहे. “आता शोभतोयस खरा फिल्टरपाड्याचा बच्चन”, “ओळखलंच नाही”, असा अनेक कमेंट करत त्याचं कौतुक केलं आहे.

Tags: gaurav moreGaurav More Viral Lookmadness machayenge showmarathi actor
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Kshitij Zarapkar Death

अभिनेते, दिग्दर्शक क्षितिज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.