कपडे म्हटले की सगळ्यांचा आवडता विषय! आपण हल्ली ब्रँडेड कपडे हे फक्त ऍमेझॉन, फ्लिपकार्ट किंवा myntra सारख्या अनेक ऑनलाईन शॉपिंग साईटवर पाहतो. मुंबईतला फॅशन स्ट्रीट परिसर, दादर पश्चिमेकडे आणि उल्हासनगर अशा अनेक भागात वर्षानुवर्षे विविध ब्रॅंड्सचे विविध फॅशनेबल कपडे अगदी सहज मिळत आहेत. मुंबई हे होलसेल मार्केटची नगरी आहे. मुंबईतील स्ट्रिट शॉपिंगही दर्जेदार आहे. पण आता अलिकडे सेलच्या माध्यमातूनसुद्धा या प्रकारचे कपडे अगदी सहज आणि तेही कमी किंमतीत मिळत आहेत. आपल्या आवडीनुसार आणि बदलत्या ट्रेंड्सनुसार कपडे खरेदी करण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. आता मुंबईमधील प्रसिद्ध ठिकाणी सगळ्यांसाठीच कमी किंमतीत ब्रँड्सचे कपडे खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
घाटकोपरमध्ये हा सेल सुरु आहे. या सेलमध्ये वेगवेगळे फॅशनेबल जॅकेट्स, ट्राऊजर्स, जीन्स, लहान मुलांचे कपडे हा सेल सर्व प्रकारचे सूट, साड्या, सलवार कुर्ती सेट, लेहेंगा, कुर्ता पायजमा आणि शेरवानी उपलब्ध आहेत. याशिवाय मुला-मुलींसाठी खास पारंपरिक कपड्यांपासून ते अगदी अलीकडच्या फॅशनपर्यंत सर्व प्रकारचे कपडे सर्वात कमी दरात उपलब्ध असणार आहेत. कॅज्युअल वेअर व्यतिरिक्त, जीन्स, कुर्ते, लेगिन्स, टी-शर्ट, क्रॉप टॉप, बॉडीकॉन ड्रेसेस आणि अनेक उत्पादने इथे विशेष सवलतीत मिळू शकतील. यासर्व वस्तू ब्रँडेड, दर्जेदार अशा आहेत. तुम्ही यामध्ये जास्तीत जास्त म्हणजेच तब्बल ८० टक्के सूट मिळवू शकता.
अहो, एवढंच नाही, तर मुलांना आणि पुरुषांनासुद्धा आजकाल नवनवीन फॅशन करून अगदी टॉपमध्ये राहायला आवडतं. त्यांच्यासाठीसुद्धा स्पायकर, ली कूपर, पार्क ऍव्हेन्यू यासारख्या ब्रँडेड कंपन्यांचे फॉर्मल, सेमी फार्मला आणि कॅज्युअल शर्ट्स शिवाय जीन्स आणि जॅकेटसुद्धा जास्तीत जास्त सवलतीत खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे. जर एखाद्या कार्यक्रमासाठी किंवा लग्नासाठी उत्तम ब्लेजरसुद्धा तुम्हाला इथे उपलब्ध असणार आहे. कमीत कमी किंमतीत २०० रुपयांपासून अगदी कपड्यांची सुरुवात आहे.
घरातल्यांसाठी, मित्र-मैत्रिणींसाठी तसेच स्वतःसाठी चांगले कपडे खरेदी करण्याची ही सुयोग्य वेळ आहे. नेहमी एखाद्या मॉलमध्ये खूप जास्त महाग किमतींना हे कपडे आपल्याला खरेदी करावे लागतात. पण तेच उत्तम दर्जाच्या ब्रॅण्ड्सचे कपडे आपल्याला असे सेलमध्ये मिळाले तर कुणाला नकोत नाही का? घाटकोपर स्वामीनारायण मंदिरापाशी लॅव्हेंडर बागमध्ये हा सेल आहे. हा सेल ३ मे २०२४ ते ६ मे २०२४ सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत असा तीन दिवस आहे. तेव्हा जाताय ना नक्की? कारण अशा संधीची मज्जा पुन्हा अनुभवता केव्हा येणार? हो ना…