‘तुला पाहते रे’ या मालिकेतून अभिनेत्री गायत्री दातार घराघरात पोहोचली. या मालिकेमध्ये ती सुप्रसिद्ध अभिनेता सुबोध भावेबरोबर मुख्य भूमिकेमध्ये काम करताना दिसली होती. या मालिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली होती. गायत्रीच्या भूमिकेचे खूप कौतुकही करण्यात आले होते. एक वर्ष या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यानंतरही या मालिकेतील सर्व पात्र आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. या मालिकेचा शेवट झाल्यानंतर आयत्री फारश्या कोणत्या कार्यक्रमामध्ये दिसून आली नाही. मात्र आता ती पुन्हा एकदा नव्या स्वरूपात नव्या भूमिकेत प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सिद्ध झाली आहे. तिच्या नवीन मालिकेचा प्रोमो समोर आला आहे. (gayatri datar new serial)
‘तुला पाहते रे’, ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामध्ये दिसल्यानंतर गायत्री पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येणार आहे. कलर्स वाहिनीवरील ‘अबीर गुलाल’ या मालिकेतून ती पुन्हा एकदा अभिनय करताना दिसणार आहे. ‘कलर्स मराठी वाहिनीवर अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अशाच एका नवीन मालिकेचा म्हणजे ‘अबीर गुलाल’ या मालिकेचा प्रोमो काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला होता. या प्रोमोमध्ये रुग्णालयात दोन बाळांची अदलाबदल होताना दिसली. या मालिकेचा आता दूसरा प्रोमोदेखील प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
या नवीन प्रोमोमध्ये मालिकेतील प्रमुख पात्रांची ओळख होत आहे. या मालिकेमद्धे गायत्री शुभ्राच्या भूमिकेत दिसत आहे तर पायल जाधव ही नव्याने मालिकाविश्वात या मालिकेच्या निमित्ताने पदार्पण करत आहे. यांमध्ये ती श्रीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. तिची ही पहिलीच मालिका असून याआधी ती ‘बापल्योक’ या चित्रपटामध्ये दिसून आली होती. या मालिकेमध्ये गायत्री म्हणजेच शुभ्रा ही श्रीमंत कुटुंबामध्ये वाढलेली दिसत असून तिला काळ्या रंगाचा तिरस्कार आहे तर श्री ही गरीब कुटुंबात वाढलेली दाखवण्यात आली आहे. दोघींच्याही वागण्यात खूप फरक असलेला पाहायला मिळत आहे.
या प्रोमोमुळे त्यांचं नातं काय आहे?, त्यांच्या आयुष्यातील नेमकी गुंतागुंत काय आहे? याबाबत प्रेक्षक प्रोमो पाहून उत्सुक झाले आहेत. या मालिकेची वेळ अद्याप समोर आली नसून लकरच प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकते.