दहा वर्ष आपल्या विनोदी अंगानं प्रेक्षकांचे अविरतपणे मनोरंजन करणाऱ्या कार्यक्रमात अग्रस्थानी नाव घेतलं जातं ते म्हणजेच ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाचं. ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमांने आजवर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. या कार्यक्रमाने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी या कार्यक्रमातील कलाकारांवर प्रेक्षक अजूनही प्रेम करतात आणि त्यांना अजूनही मिस करताना दिसतात. अशातच या कार्यक्रमाची धुरा सांभाळणाऱ्या निलेश साबळे यांचं करावं तितकं कौतुक कमीच. विनोदी लेखनानं, विनोदी अभिनयाने निलेश साबळे यांनी आजवर प्रेक्षकांच्या मनात घर केलं. (Nilesh Sabale Funny Video)
या कार्यक्रमातून निरोप घेतल्यानंतर निलेश साबळे हे नवीन कार्यक्रमातून आपल्या प्रेक्षकांच्या भेटीस आले. ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘हसताय ना हसायलाच पाहिजे’ या कार्यक्रमातून निलेश साबळे यांनी एन्ट्री घेतली आहे. या कार्यक्रमात भाऊ कदम व ओमकार भोजनेची जोड निलेश साबळे यांना मिळालेली पाहायला मिळत आहे. निलेश साबळे यांच्या लेखनाचे अभिनयाचे चाहते आहेतच, मात्र ते उत्तम डॉक्टरदेखील आहेत, हे फार कमी जणांना ठाऊक असेल. डॉक्टर निलेश साबळे असं त्यांचं नाव असून ते पेशाने डॉक्टर आहेत. मात्र ते त्यांची अभिनयाची कला जोपासताना दिसतात. या डॉक्टरकीकडे काहीसं दुर्लक्ष करून ते त्यांची कला जोपासत आहेत. याची पुन्हा एकदा जाणीव एका छोट्याशा चिमुकल्याने त्यांना करून दिलेली पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा – ‘पारू’च्या खऱ्या आयुष्यातील जोडीदाराला पाहिलंत का?, अभिनेत्रीचा नवरा करतो हे काम
एक रील व्हिडीओ त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये डॉक्टर विसरभोळे आणि डॉक्टर साबळे यांचा गोड तक्रारवजा संवाद पाहायला मिळत आहे. डॉ.साबळे हे डॉ.विसरभोळेंना बोलावतात. तेव्हा डॉ.विसरभोळे विचारतात, “बोला काय आजार आहे?, काय उपचार करु?, असं विचारतात. यावर डॉ. साबळे म्हणतात, “मला उपचाराची गरज नाही. मी स्वतःच डॉक्टर आहे. तुम्हाला तुमच्या आई-वडिलांनी शिकवलं, पैसा लावला, डॉक्टर बनवलं, आणि साधं र ला र बोलता येत नाही आहे. ल बोलत आहात.
यावर डॉ.विसरभोळे निलेश साबळेंची शाळा घेत प्रतिउत्तर देतात. आणि म्हणतात, “तुम्हाला तुमच्या आई-बाबांनी तुम्हाला शिकवलं, पैसा लावला. डॉक्टर बनवलं आणि लोकांना तपासायचं सोडून इथे ऍक्टिंग करत बसलाय, काय फायदा त्या शिक्षणाचा. सांगू का तुमच्या आई-बाबांना”, असं म्हणत साबळेंची शाळा करतात. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटकरी या व्हिडीओवर भरभरून कमेंटचा वर्षाव करताना दिसत आहेत.