‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेत सोढीची भूमिका साकारणारा अभिनेता गुरुचरण सिंग दिल्लीतून बेपत्ता झाल्याचे वृत्त येताच एकच खळबळ उडाली. हा अभिनेता दिल्ली विमानतळावरून बेपत्ता झाला होता. विमानतळावरून तो मुंबईला जात असल्याची माहिती मिळाली, मात्र, तो मुंबईला पोहोचला नाही आणि त्याच्या घरीही परतला नाही. याबद्दल अभिनेत्याच्या वडिलांनी पोलिसांत तक्रारही दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी “अभिनेता २२ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजता मुंबईला जाण्यासाठी विमानतळावर गेला होता. मात्र तो मुंबईला पोहोचला नाही आणि पुन्हा घरीही परतला नाही. त्याचा फोनद्वारेही काही संपर्क होत नाही. तो बेपत्ता झाला आहे.” असं म्हटलं होतं.
अशातच आता दिल्ली पोलिसांना अभिनेत्याचे सीसीटीव्ही फुटेज मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. या फुटेजमध्ये गुरुचरण सिंग रात्री ९.१४ वाजता दिल्लीतील पालम भागातील परशुराम चौकात कुठेतरी फिरताना दिसत आहेत. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये गुरुचरण पायी चालताना दिसत आहेत. त्याच्या पाठीवर बॅग आहे. दरम्यान, आज दिल्ली पोलीस गुरुचरण सिंह यांच्या बँक तपशीलांचीही चौकशी करणार आहेत, ज्यामुळे त्यांना अभिनेत्याबद्दल काही आणखी तपशील मिळू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे.
आणखी वाचा – केतकी दारूच्या नशेत, फाल्गुनीला कानाखाली मारल्यानंतर स्वत:ला संपवणार?, देवी आईच्या लेकी संकटात
‘आजतक’च्या वृत्तानुसार, गुरुचरण सिंह २२ एप्रिलपासून बेपत्ता असल्याची बातमी आली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. आयपीसी कलम ३६५ अंतर्गत FIR नोंदवण्यात आला आहे. पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून त्यात अपहरणाचे प्रकरण समोर आले आहे. गुरुचरण सिंग २२ एप्रिल रोजी सकाळी मुंबईला रवाना झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.

दरम्यान, त्यांच्या अचानक बेपत्ता झाल्याच्या वृत्ताने मनोरंजन सृष्टीसह त्यांच्या अनेक चाहत्यांमध्ये सध्या खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर त्यांचे अनेक चाहते सध्या चिंतेत आहेत. त्यांनी तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेत रोशन सिंग सोढीची भूमिका साकारली होती. मात्र वडिलांच्या तब्येतीच्या समस्येमुळे त्यांनी ही मालिका सोडली होती. त्या काळात त्याला त्याच्या कुटुंबावर लक्ष केंद्रित करायचे होते.