सध्या सर्वत्र मराठी मनोरंजन विश्वातील एक अभिनेता विशेष चर्चेत आला आहे. हा अभिनेता त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला असल्याचं समोर आलं आहे. अभिनेता, दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर त्यांच्या मुलाच्या नावावरुन ट्रोल झाला असल्याचं पाहायला मिळालं. या ट्रोलिंगला उत्तर देत चिन्मयने केलेलं भाष्य सध्या साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. चिन्मयने नुकतीच एका पॉडकास्टला मुलाखत दिली. या मुलाखतीनंतर चिन्मय त्याच्या मुलाच्या नावावरुन ट्रोलींगच्या कचाट्यात अडकला. सोशल मीडियावर अनेकांनी अभिनेत्याला बरंच ट्रोल केलं. मात्र यावर त्याने स्पष्टीकरणही दिलेलं पाहायला मिळालं. (Supriya Pilgaonkar On Chinmay Mandlekar Son)
चिन्मयच्या मुलाचं नाव हे जहांगीर आहे. या नावावरुन अभिनेत्याला व त्याच्या ११ वर्षाच्या मुलाला ट्रोल केलं. कायमच महाराजांची भूमिका करणाऱ्या या अभिनेत्याने त्याच्या मुलाचं नाव जहांगीर ठेवलं असल्याने अभिनेत्याला ट्रोल केलं. चिन्मयने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्याने या प्रकरणाबाबत त्याच मत स्पष्ट केलं. चिन्मय म्हणाला, “महाराजांच्या भूमिकेने आतापर्यंत मला खूप प्रेम दिलं. पण, जर महाराजांची भूमिका मी केली म्हणून माझ्या कुटुंबाला आणि माझ्या ११ वर्षांच्या मुलाला या मानसिक त्रासाला सामोरं जावं लागत असेल, तर त्यांची माफी मागून मी तुम्हा सगळ्यांसमोर हे जाहीर करु इच्छितो की, यापुढे मी महाराजांची भूमिका करणार नाही”. चिन्मयच्या या निर्णयाने त्याच्या चाहत्यांना आणि कलाकार मंडळींना खूप मोठा धक्का बसला.

चिन्मयच्या या निर्णयानंतर अनेक कलाकार मंडळींनी अभिनेत्याला पाठिंबा दर्शविला. अशातच लोकप्रिय व ज्येष्ठ अभिनेत्री यांनी देखील या प्रकरणावरुन भाष्य केलं आहे. अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन एक स्टोरी पोस्ट केली आहे. या स्टोरीमध्ये त्याने “जहांगिर मांडलेकर! तुला अधिकाधिक शुभेच्छा”, असं कॅप्शन देत तिने या प्रकरणावरुन मांडलेकर कुटुंबाला पाठिंबा दर्शविला आहे. या प्रकरणावरुन त्यांनी चिन्मयचा लेक जहांगिरला शुभेच्छा दिल्या आहेत.
मोठ्या पडद्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकाराणाऱ्या काही अभिनेत्यांपैकी एक लोकप्रिय व सुप्रसिद्ध अभिनेता म्हणजे चिन्मय मांडलेकर. आजवर चिन्मयने विविध भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात घर केलं. मात्र चिन्मयला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. मात्र मुलाच्या नावावरुन ट्रोल झाल्यानंतर अभिनेत्याने त्याच्या खऱ्या आयुष्यात महाराजांची भूमिका कधीच करणार नसल्याचा निर्णय घेतला.