मराठी चित्रपट सृष्टीचं नाव जेव्हा जेव्हा घेतलं जातं तेव्हा काही नाव अगदी हमखास घेतली जातात. या नावांपैकी काही नावं म्हणजे दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे, अभिनेते अशोक सराफ. अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम करत विनोदाचं तुफान टायमिंग साधत या दोघांनी विनोदाचा एक नवीन दर्जा निर्माण केला. आजही लोक या दोघांची धमाल केमीस्ट्रीचा निखळ आनंद घेताना पाहायला मिळतात.(Laxmikant Berde Ashok Saraf)
रुपेरी पडद्यावर मिश्किल वाटणारे हे दोन अवली कलाकार खऱ्या आयुष्यात देखील तितकेच मिश्किल स्वभावाचे होते याचे अनेक किस्से अशोक सराफ यांनी त्यांच्या बहुरूपी या आत्मचरित्रात सांगितले आहेत. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या या मिश्किल स्वभावाचा अनुभव एकदा निवेदिता सराफ यांना देखील आला होता याबाबतचा किस्सा देखील अशोक सराफ यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिला आहे.

लक्ष्मीकांत बेर्डे व निवेदिता सराफ हे पूर्वीपासून एकमेकांचे चांगले मित्र होते. एकदा सोनाराच्या दुकानात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या एका विनोदी वाक्यामुळे चांगलाच हशा पिकला होता. घडलं असं होतं निवेदिता सराफ यांनी दागिन्यांच्या दुकानात एक हिऱ्याचा हार पाहिला आणि लक्ष्मीकांत यांना त्या म्हणाल्या मला तो हार खूप आवडला आणि पाहताच तो घ्याची इच्छा झाली या वर क्षणाचा विलंब न करता लक्ष्मीकांत बेर्डे अशोक सराफ यांच्याकडे आणि एकदा निवेदिता यांच्याकडे बघून म्हणाले ‘बाई, एक लक्षात ठेव, तू चुकीचा सराफ शोधलास’ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचं हे उत्तर ऐकून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.(Laxmikant Berde Ashok Saraf)
महाराष्ट्राचे लाडके जेष्ठ विनोदी अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे जरी आपल्यामध्ये नसले तरी ते प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये जिवंत आहेत. त्यांनी त्यांच्या अभिनयाने फक्त मराठी माणसालाच नाही तर संपूर्ण भारतीयांना त्यांच्या विनोदी अभिनयाचे वेड लावले. लक्ष्मीकांत बेर्डे म्हणायचे कोणतीही विनोदी भूमिका करताना, आपल्या समोर असलेल्या सहकलाकाराचा प्रतिसाद सुद्धा तेवढाच महत्वाचा असतो. त्यामुळे विनोद हा एकट्याने कधीच होत नाही. लक्ष्मीकांत यांच्या अप्रतिम उपजात बुद्धिमत्तेमुळे त्यांना त्यांचे सहकलाकार आज सुद्धा लक्ष्मीकांत बेर्डे यांची आठवण काढतात.