रविवार, जुलै 26, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लग्नापूर्वी एकत्र राहण्याचा सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा तरुणांना सल्ला, मुकेश खन्ना भडकले, म्हणाले, “आपल्या संस्कृतीमध्ये अशा गोष्टींना…”

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 20, 2024 | 5:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
mukesh khanna on zeenat aman

लग्नापूर्वी एकत्र राहण्याचा सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा तरुणांना सल्ला, मुकेश खन्ना भडकले, म्हणाले, "आपल्या संस्कृतीमध्ये अशा गोष्टींना…"

लग्नाआधी एकमेकांना समजून घेण्यासाठी लिव्ह इन मध्ये राहावे असा सल्ला त्यांनी सोशल मीडियामार्फत दिला होता. काहींना त्यांचे विचार पटले तर काहींनी या सर्वाला विरोध दर्शवला आहे. अनेक चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांना याला विरोध केला असून त्यामध्ये शक्तिमान म्हणून प्रसिद्ध असलेले मुकेश खन्ना यांनी तीव्र विरोध  दर्शवला आहे. याआधीही त्यांनी अभिनेता रणवीर सिंह  शक्तिमानची भूमिका साकारणार असल्याने नाराजी दर्शवली होती. अशातच त्यांनी आता झीनत यांच्यावरही निशाणा साधला आहे. त्यांनी झीनत यांना त्यांच्या लिव्ह इनच्या सल्ल्यावरून सुनावलं आहे. (mukesh khanna on zeenat aman)

पुढे ते म्हणाले कि, “लिव्ह इन रिलेशनबद्दल झीनत यांनी सांगितले कि लिव्ह इन मध्ये राहिल्याने मुलगा मुलगी एकमेकांना ओळखू लागतात. पण हे एकमेकांना ओळखायचे नाही आहे. जर मुलगा व मुलगी लग्नाआधी लिव्ह इन मध्ये राहिले आणि जर त्यांच जमल नाही तर त्याचा त्यांच्या आयुष्यावर किती वाईट  परिणाम होईल हे देखील समजून घ्या. जे लोक असे बोलत आहे त्यांनी विचार करून बोलावं”.  

आणखी वाचा – ‘तारक मेहता…’च्या टप्पूने लोकप्रियता, पैसा मिळत असूनही मालिका का सोडली?, स्वतःच केला खुलासा, म्हणाला, “खूप चढ-उतार…”

View this post on Instagram

A post shared by Zeenat Aman (@thezeenataman)

झीनत यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली होती. यामध्ये त्यांनी लिहिले होते  की “तुमच्यापैकी कोणी रिलेशनशिपमध्ये असेल तर त्यांनी आधी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहावे असा मी सल्ला देईन. मी माझ्या मुलांनादेखील हाच सल्ला दिला आहे. दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत.लग्न करायच्या आधी कुटुंबामध्ये मिसळताना, नाती बनवताना एक परीक्षा घ्यावी. दिवसातील काही तासांसाठी आपण स्वतःला खूप चांगले दाखवू शकतो. पण तुम्ही बाथरुम शेअर करु शकता का?, एकमेकांवरील राग व्यक्त करु शकता का? रोज रात्री जेवण काय बनवावे याबद्दल सहमती असते का? हे माहीत करुन घेणे खूप महत्त्वाचे असते”.

आणखी वाचा – “लग्नाआधी एकत्र राहा आणि…”, बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा तरुण मंडळींना अजब सल्ला, म्हणाल्या, “बेडरुममध्ये एकमेकांना किती महत्त्व…”

तसेच त्यांनी लिहिले होते की,“तुम्ही बेडरुममध्ये एकमेकांना किती महत्त्व देतात? छोट्या छोट्या गोष्टींवरुन होणारी भांडणं सोडवू शकतात का? थोडक्यात सांगायचे झाले तर तुम्ही एकमेकांसाठी योग्य आहात का? हे समजणे महत्त्वाचे असते. आपला भारतीय समाज लग्नाआधी एकत्र राहण्याला पाप समजतो. पण अशा अनेक गोष्टी आहेत ज्याला समाज पाप समजतो”.

झीनत यांच्या पोस्टने सगळ्यांचेच लक्ष वेधले गेले होते. मुकेश यांच्या वक्तव्यावर आता झीनत काही प्रतिक्रिया देतात का? हे पाहण्यासारखे आहे.

Tags: live in relationshipmukesh khannaZeenat aman
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Pach Futacha Bachchan Marathi Movie
Entertainment

‘पाच फुटाचा बच्चन’ चा दैदीप्यमान प्रवास : कीर्तन, संस्कृती आणि संघर्षाची प्रेरणादायी कथा

जुलै 25, 2026 | 2:00 pm
Shekhar Suman On Student Protest
Entertainment

तीन दिवस झोप नाही, रडत आहे आणि…; आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जमुळे प्रसिद्ध अभिनेत्याला दुःख, म्हणाला…

जुलै 25, 2026 | 12:45 pm
Eva grover husband hyder ali khan
Entertainment

दिग्दर्शकासह शरीरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती आणि…; नवऱ्याबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “पैशांसाठी…”

जुलै 25, 2026 | 11:00 am
Akanksha Chamola Gaurav Khanna Lock Upp 2
Entertainment

Lock Upp 2 : गौरव खन्नाची कुत्र्याशी तुलना करणं पत्नीला पडलं भारी, नेटकरी भडकले, म्हणाले, “घटस्फोट दे…”

जुलै 25, 2026 | 9:50 am
Next Post
Juhi Chawla as Draupadi

"शॉर्ट कपडे, मिनी स्कर्टस यामध्ये अभिनय अन्.." गाजलेल्या महाभारतात द्रौपदीच्या भूमिकेत दिसली असती जुही चावला

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.