रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तुझा नवरा किती हॉट?”, प्रथमेश परबच्या बायकोला टॅग करत सुप्रसिद्ध अभिनेत्याची कमेंट, पार्टीमधील लूक चर्चेत

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 19, 2024 | 7:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
'Taaza Khabar' fame Bhuvan Bam appricitaed Prathamesh Parab's look with tag his wife Kshitija Ghosalkar

‘आठवी-अ’ वेबसीरिजला भरघोस प्रतिसाद, उद्या साताऱ्यात होणार खास सेलिब्रेशन, प्रेक्षकांना कलाकारांना भेटण्याची सुवर्ण संधी

‘टाइमपास’ या लोकप्रिय चित्रपटातून अवघ्या घराघरांत पोहोचलेला अभिनेता म्हणजे प्रथमेश परब. ‘टाइमपास’ नंतर प्रथमेशने अनेक चित्रपटांत काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारा हा कलाकार नुकताच त्याच्या लग्नामुळे चांगलाच चर्चेत आला होता. अशातच आता तो त्याच्या आगामी सीरिजमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. प्रथमेश लवकरच त्याच्या ताजा खबर या सीरिजच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करायला सज्ज झाला आहे.

भुवन बाम आणि श्रिया पिळगांवकर यांची प्रमुख भूमिका असलेली ‘ताजा खबर’ ही सीरिज गेल्यावर्षी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती आणि आता लवकरच या सीरिजचा दुसरा भागही प्रदर्शित होणार आहे. यामध्ये अभिनेता प्रथमेश परब महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार असून नुकतीच या सीरिजची Wrap पार्टी पार पडली. या पार्टीचा एक व्हिडीओ प्रथमेशने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये प्रथमेशच्या या सीरिजमधील लुक पाहायला मिळत आहे.  या व्हिडीओला प्रथमेशच्या चाहत्यांनी व ‘ताजा खबर’च्या प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे.

View this post on Instagram

A post shared by Prathamesh Parab (@prathameshparab)

आणखी वाचा – “बायकांच्या भूमिका करायला स्त्रिया नाहीत का?”, निलेश साबळेच्या नव्या शोचा प्रोमो पाहून प्रेक्षक भडकले, म्हणाले, “‘चला हवा येऊ द्या’ सारखंच…”

या व्हिडीओला अनेकांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. मात्र या व्हिडीओवरील एका कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडीओवर भुवनने कमेंट करत प्रथमेशचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर त्याने त्याच्या बायकोलाही टॅग केलं आहे. भुवनने  “माझा भाऊ कसला भारी दिसत आहे. क्षितिजा घोसाळकर तुझा नवरा खूप हॉट आहे.” असं म्हटलं आहे. यावर प्रथमेशची बायको क्षितिजानेही “हो मी तुझ्याशी सहमत आहे” असं म्हणत त्याला उत्तर दिलं आहे.

आणखी वाचा – Video : ‘चला हवा येऊ द्या’मधून बाहेर पडल्यानंतर निलेश साबळेचा नवा शो, मात्र भाऊ कदमची साथ कायम, म्हणाला, “तुमचे आशिर्वाद…”

दरम्यान, ताजा खबर’ या सीरिजद्वारे प्रथमेशने ओटीटीवर पदार्पण केले असून या सीरिजच्या दुसऱ्या भागातही तो पाहायला मिळणार आहे. या सीरिजमध्ये त्याच्याबरबर श्रिया पिळगांवकर, अतिषा नाईक, विजय निकम व महेश मांजरेकर हे कलाकारदेखील आहेत.  त्यामुळे अनेकांना या सीरिजची उत्सुकता लागून राहिली आहे.  

Tags: Bhuvan Bamentertainment newsprathamesh parab
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
20 april 2024 panchang mesh to meen rashi bhavishya see the details

‘या’ राशीच्या लोकांनी अनावश्यक खर्च टाळावा, तर काही राशींसाठी आरोग्याचा धोका, जाणून घ्या तुमचा उद्याचा दिवस कसा असणार?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.