शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

वनपीस, शूज अन्…; साडी, नथ नव्हे तर गौतमी पाटीलचा बीच लूक चर्चेत, वेस्टर्न लूकमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 20, 2024 | 2:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Gautami Patil Western Look

वनपीस, शूज अन्…; साडी, नथ नव्हे तर गौतमी पाटीलचा बीच लूक चर्चेत, वेस्टर्न लूकमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल

नृत्यांगना गौतमी पाटील हे नाव काही महाराष्ट्राला नवीन नाही. लावणीच्या कार्यक्रमातून अचानक लोकप्रियतेस आलेली गौतमी पाटील हिचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. सोशल मीडियावर गौतमी चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात राहत असते. लावणी क्वीन म्हणून गौतमीने स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. गौतमीने नेहमीच तिच्या कार्यक्रमाने, तिच्या नृत्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं आहे. बरेचदा गौतमी कॉन्ट्रोवर्सीमध्ये देखील अडकलेली पाहायला मिळाली. मात्र वेळोवेळी तिने या कॉंट्रोव्हर्सीला उत्तर दिलेले पाहायला मिळालं. (Gautami Patil Western Look)

आपल्या दिलखेचक अदांनी गौतमीने सर्वांचं मन जिंकून घेतलं आहे. अभिनेत्रीने कायमच तिच्या नृत्यकलेने चाहत्यांवर अधिराज्य गाजवलं. आजवर गौतमीने मराठमोळ्या अंदाजात नऊवारी परिधान करत कायमच कार्यक्रमांमध्ये हजेरी लावली. गौतमीचा मराठमोळा पारंपरिक अंदाज नेहमीच प्रेक्षकांना भावला. अशातच आता गौतमीने सोशल मीडियावरुन शेअर केलेल्या एका पोस्टाने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यात गौतमीचा वेस्टर्न अंदाज पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – “देवाच्या गाण्याची वाट कशाला लावता?”, अमृता फडणवीस यांचं ‘हे राम’ गाणं ऐकून भडकले प्रेक्षक, म्हणाले, “आमच्यावर दया करा”

View this post on Instagram

A post shared by Gautami Patil (@official_gautami941__)

गौतमीचा बीचवरील हटके लूक या पोस्टमधून समोर आला आहे. तिच्या या फोटोंनी साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. बीचवरील काही फोटो शेअर करत ती फिरायला गेली असल्याचं समोर आलं आहे. गौतमीच्या या बीचलूक फोटोवरुन नजर हटत नाही आहे. यावेळी गौतमीन पिवळ्या रंगाचा वनपीस परिधान केला होता. आणि त्याखाली हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने पांढऱ्या रंगाचे शूज कॅरी केले होते. तसेच डोक्यावर टोपी घालून तिने बीचवर काढलेले फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कमीत कमी ॲक्सेसरीज परिधान करत गौतमीने केलेला हा वेस्टर्न लूक साऱ्यांनाच विशेष भावला आहे. यंदाच्या उन्हाळ्यामध्ये असा सिम्पल लूक तुम्ही कॅरी करु शकता. ज्यामुळे गरम कमी होण्यास मदत होईल.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध अभिनेत्री शूटिंगला असताना घरी बाळ बेडवरुन खाली पडलं अन्…; स्वतःच सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “देवाच्या कृपेने…”

गौतमीचा हा सिम्पल लुक असला तरी सोशल मीडियावर तिच्या या लूकने वातावरण हॉट करून सोडलं आहे, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. गौतमीच्या या वेस्टर्न अंदाजातील पोस्टवर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट करत तिचं भरभरुन कौतुक केलेलं पाहायला मिळतं आहे. या लूकसाठी गौतमीने अजिबात मेकअप केला नव्हता. नो मेकअप लूकमध्ये गौतमी दिसली असून चाहत्यांनाही तिचा हा लूक विशेष आवडलेला पाहायला मिळत आहे. आतापर्यंत आपण गौतमीला साड्यांमध्येच पाहिले मात्र वेस्टर्न वेअरमध्येही गौतमी तितकीच सुंदर दिसते.

Tags: entertainmentgautami patilgautami patil danceGautami Patil Western Look
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Laxmikant Berde Ashok Saraf

तेव्हा लक्ष्मीकांत बेर्डे निवेदिता सराफ यांना म्हणाले होते "बाई एक लक्षात ठेव तू चुकीचा सराफ शोधलास", वाचा नक्की काय आहे किस्सा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.