शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Lata Mangeshkar Award 2024 : अमिताभ बच्चन यांना यंदाचा लता मंगेशकर पुरस्कार जाहिर, ए.आर. रहमान, अशोक सराफ यांचाही होणार खास सन्मान

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 16, 2024 | 7:37 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Lata Mangeshkar Award 2024 has been announced to amitabh Bachchan a r Rahman and ashok saraf will also honored

Lata Mangeshkar Award 2024 : अमिताभ बच्चन यांना यंदाचा लता मंगेशकर पुरस्कार जाहिर, ए.आर. रहमान, अशोक सराफ यांचाही होणार खास सन्मान

मंगेशकर प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी संगीत, नाटक, कला, वैद्यकीय, पत्रकारीता व सामाजिक कार्य क्षेत्रातील दिग्गजांचा सत्कार केला जातो व त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येतो.  अशातच नुकतीच ‘लता दीनानाथ मंगेशकर २०२४’ या पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून यंदा या पुरस्काराचे मानकरी बिग बी अमिताभ बच्चन ठरले आहेत. तर दिग्गज संगीतकार-गायक ए. आर. रहमान यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

२०२२ साली या पुरस्कारची घोषणा करण्यात आली असून २०२४ हे या पुरस्काराचे तिसरे वर्ष आहे. अंतर्गत हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. २०२४ हे या पुरस्काराचे तिसरे वर्ष असून पहिल्या वर्षी हा पुरस्कार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला होता. तर दुसऱ्या वर्षी हा मान आशा भोसले यांना मिळाला होता. आता बिग बी यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल.

मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृति प्रतिष्ठान ही विश्वस्त संस्था गेली ३४ वर्षे पुणे येथे कार्यरत असून ही संस्था मंगेशकर कुटुंबियांनीच स्थापन केली आहे आणि याचा मुळ उद्देश हा दिवंगत मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा स्मृतिदिन (दि.२४) एप्रिल रोजी प्रतिवर्ष साजरा करणे हा आहे. आत्तापर्यंत सुमारे 212 व्यक्तींना गेल्या 34 वर्षात हे पुरस्कार प्रदान केले आहेत. तसेच या दिवशी पुरस्कार सोहळ्यानंतर संगीत तथा नाट्य, नृत्य असे कलाक्षेत्रातील विविध कार्यक्रम केले जातात.

यंदाचा हा प्रतिष्ठित दीनानाथ पुरस्कार आणि ट्रस्टच्या इतर पुरस्कारांचा वितरण सोहळा २४ एप्रिल २०२४ रोजी पार पडणार आहे. मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या स्मृतिदिनी हा सोहळा होईल. यंदा हा पुरस्कार वितरण सोहळा दीनानाथ नाट्यगृह, विलेपार्ले याठिकाणी होणार आहे.

लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार : अमिताभ बच्चन 

मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा प्रदीर्घ संगीत सेवा : ए. आर. रेहमान

मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रदीर्घ नाट्यसेवा पुरस्कार : अशोक सराफ

मास्टर दिनानाथ मंगेशकर प्रदीर्घ नाट्यसेवा पुरस्कार : अतुल परचुरे

मास्टर दिनानाथ मंगेशकर उत्कृष्ट चित्रपट निर्मिती विशेष पुरस्कार : रणदीप हुडा

Tags: A. R. Rahmanamitabh bachchanashok sarafLata Mangeshkar Award 2024 News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Prasad Jawade and Amruta Deshmukh's Gudipadwa special photo shoot behind-the-scenes video

Video : बायकोचे भलतेच लाड करतो प्रसाद जवादे, मेकअपला बसल्यावर तोंडासमोर पकडला फॅन अन्…; व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.