रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

रामनवमीला राशीनुसार करा ‘या’ मंत्राचा जप, अशाप्रकारे करा श्रीराम यांची पूजा, तुम्हाला आयुष्यामध्ये जाणवतील सकारात्मक बदल

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 15, 2024 | 6:49 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
रामनवमीला राशीनुसार करा 'या' मंत्राचा जप, अशाप्रकारे करा श्रीराम यांची पूजा, तुम्हाला आयुष्यामध्ये जाणवतील सकारात्मक बदल

Ramnavami 2024 chant special mantras according to 12 zodiac signs for all horoscope

‘रामनवमी’ हा सण प्रभू रामाची जयंती म्हणून साजरा केला जातो. काही धर्मग्रंथानुसार भगवान विष्णूचा सातवा अवतार भगवान श्रीराम यांचा जन्म चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवव्या तिथीला झाला होता. म्हणून या दिवसाला ‘रामनवमी’ असं म्हणतात. यावर्षी येत्या १७ एप्रिलला रामनवमी हा सण साजरा होणार आहे. प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद मिळावा म्हणून या दिवशी भाविक मोठ्या भक्तिभावाने रामाची पूजा करतात. रामनवमीच्या दिवशी प्रभू रामाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी या दिवशी राशीनुसार मंत्रांचा जप केल्यास तुमचे जीवन बदलू शकते. तर जाणून घेऊयात या मंत्रांबद्दल…

मेष : मंगळ हा मेष राशीचा स्वामी आहे. त्यामुळे मेष राशीच्या लोकांनी रामनवमीच्या दिवशी श्री रामरक्षा स्तोत्राचे पठण करणे उत्तम राहील. रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः। रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोस्म्यहं रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धरा: ॥ या मंत्राचा जप केल्याने तुमचे सर्व दु:ख व संकटांपासून मुक्ती होईल.

वृषभ : शुक्र हा वृषभ राशीचा स्वामी आहे, त्यामुळे वृषभ राशीच्या लोकांनी रामनवमीच्या दिवशी श्री राम स्तुतीचा पाठ करावा. श्री राम चंद्र कृपालु भजमन हरण भाव भय दारुणम्। नवकंज लोचन कंज मुखकर, कंज पद कन्जारुणम्॥ कंदर्प अगणित अमित छवि नव नील नीरज सुन्दरम्॥ या मंत्राचा जप केल्यास प्रभू रामाचा आशीर्वाद राहील आणि भौतिक सुख-सुविधांमध्ये वाढ होईल

मिथुन : मिथुन राशीचा स्वामी बुध आहे, त्यामुळे मिथुन राशीच्या लोकांनी रामनवमीच्या दिवशी इंद्राने लिहिलेल्या श्री राम स्तोत्राचे पठण करावे. रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः। रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोस्म्यहं रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धरा:॥ या मंत्राचा जप केल्यास नोकरी-व्यवसायात प्रगती होईल आणि बुद्धिमत्ता विकसित होईल.

कर्क : कर्क राशीचा स्वामी चंद्र देव आहे, त्यामुळे कर्क राशीच्या लोकांनी राम नवमीच्या दिवशी श्री राम अष्टकाचे पठण करावे. श्री राम चंद्र कृपालु भजमन हरण भाव भय दारुणम्। नवकंज लोचन कंज मुखकर, कंज पद कन्जारुणम्॥ कंदर्प अगणित अमित छवी नव नील नीरज सुन्दरम्। पट्पीत मानहु तडित रूचि शुचि नौमी जनक सुतावरम्॥ या मंत्राचे पठन केल्यास प्रत्येक कार्य पूर्ण होईल आणि मानसिक शांतीही मिळेल.

सिंह : सिंह राशीचा स्वामी सूर्य देव आहे, त्यामुळे सूर्य राशीच्या लोकांसाठी रामनवमीच्या दिवशी श्री सीताराम अष्टकचे पठण करणे शुभ राहील. ब्रह्माशम्भुफणीन्द्रसेव्यमनिशं वेदान्तवेद्यं विभुम्‌। वन्देऽहं करुणाकरं रघुवरं भूपालचूडामणिम्‌॥ या मंत्राचे पठण केल्याने तुमची अपूर्ण कामे पूर्ण होतील आणि तुमची कीर्ती व सन्मान वाढेल.

आणखी वाचा – Video : सुनील शेट्टी यांनी स्टेजवरच भारती सिंहला केलं किस, मिठीही मारली अन्…; व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

कन्या : कन्या राशीचा स्वामी बुध आहे, त्यामुळे कन्या राशीच्या लोकांनी रामनवमीच्या दिवशी श्री राम मंगलशासनम स्तोत्राचे पठण करावे. मंगलं कौशलेन्द्राय महनीयगुणाब्धय । चक्रवर्तितनूजाय सार्वभौमाय मंगलम्॥ या मंत्राचे पठण केल्यास बुद्धी व ज्ञानात वाढ होईल आणि सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते.

तूळ : तूळ  राशीचा स्वामी शुक्र आहे, त्यामुळे तूळ राशीच्या लोकांनी रामनवमीच्या दिवशी श्री राम प्रेम अष्टक मंत्राचा पाठ करावा. श्यामाम्बुदाभमरविन्दविशालनेत्रं बंधूकपुष्पसदृशाधरपाणिपादम् । सीतासहायमुदितं धृतचापबाणं रामं नमामि शिरसा रमणीयवेषम् पटुजलधरधीरध्वानमादाय चापं पवनदमनमेकं बाणमाकृष्य तूणात्॥या मंत्राचे पठण केल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतील आणि प्रत्येक गोष्टीत यश मिळेल.

वृश्चिक : वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे, त्यामुळे वृश्चिक राशीच्या लोकांनी रामनवमीच्या दिवशी श्री रामचंद्र अष्टकमाचे पठण करावे. चिदाकारो धाता परमसुखद: पावनतनुर्मुनीन्द्रैर्योगीन्द्रैर्यतिपतिसुरेन्द्रैर्हनुमता । सदा सेव्य: पूर्णो जनकतनयांग सुरगुरु रमानाथो रामो रमतु मम चित्ते तु सततम्॥ या मंत्राचे पठन केल्यास धैर्य आणि शौर्य वाढते आणि प्रत्येक क्षेत्रात यश मिळते.

धनू :  धनु राशीचा स्वामी बृहस्पति आहे, त्यामुळे धनु राशीच्या लोकांसाठी रामनवमीच्या दिवशी जटायूने ​​रचलेल्या श्री राम स्तोत्राचे पठण करणे शुभ राहील. उपरमपरमं परात्मभूतं सततमहं प्रणतोऽस्मि रामचन्द्रम्॥ निरवधिसुखमिन्दिराकटाक्षं क्षपितसुरेन्द्रचतुर्मुखादिदुःखम् । नरवरमनिशं नतोऽस्मि रामं वरदमहं वरचापबाणहस्तम् ॥ मंत्राचे पठण केल्यास ज्ञान आणि भाग्यामध्ये वाढ होईल त्याचबरोबर चांगले आरोग्य लाभेल.

मकर : मकर राशीचा स्वामी शनिदेव हा न्यायाचा देव आहे, त्यामुळे मकर राशीच्या लोकांनी राम नवमीच्या दिवशी श्री राम रक्षा स्तोत्र आणि आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करावे. ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ततो युद्धपरिश्रान्तं समरे चिन्तया स्थितम्‌ । रावणं चाग्रतो दृष्ट्वा युद्धाय समुपस्थितम्‌॥ या मंत्राचा जप केल्यास जीवनात प्रगती येईल, यश मिळेल आणि कामातील अडथळे दूर होतील.

आणखी वाचा – ‘या’ क्षेत्रामध्ये कार्यरत आहे सुलेखा तळवलकर यांची लेक, शिक्षणात यश मिळताच आईचा आनंद गगनात मावेना, म्हणाल्या, “सलग दोन वर्ष…”

कुंभ : कुंभ राशीचा स्वामी देखील शनिदेव आहे, त्यामुळे कुंभ राशीच्या लोकांनी रामनवमी श्री रामरक्षा स्तोत्र कवच सोबत सुंदरकांडाचे पठण करावे. अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमन्त्रस्य बुधकौशिक ऋषिः। श्री सीतारामचंद्रो देवता। अनुष्टुप छंदः। सीता शक्ति:। श्रीमान हनुमान कीलकम। श्री सीतारामचंद्रप्रीत्यर्थे रामरक्षास्तोत्रजपे विनियोग:॥ या मंत्राचे पठण केल्यास दु:ख नष्ट होईल आणि जीवनात केवळ शुभ व लाभदायक गोष्टी निर्माण होईल.

मीन :  बृहस्पति हा मीन राशीचा स्वामी आहे, त्यामुळे मीन राशीच्या लोकांसाठी रामनवमीच्या दिवशी बालकांडसह अयोध्या प्रसंगाचे पठण करणे शुभ राहील. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे॥ या मंत्राचे पठण केल्यास धन-समृद्धी येईल आणि प्रत्येक कामात तुमचे भाग्य तुमची साथ देईल.

Tags: Horoscope Marathi NewsRamnavami 2024Ramnavami Special Mantra
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
'या' राशींची होणार पदोन्नती, वरिष्ठांकडून मिळणार शाब्बासकी, तर 'या' राशींच्या लोकांना धनलाभाची शक्यता, जाणून घ्या...

'या' राशींची होणार नोकरीत भरभराट, वरिष्ठांकडून मिळणार शाबासकी, तर 'या' राशींना धनलाभाची शक्यता, जाणून घ्या...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.