शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : असा असतो सई लोकूरचा दिवस, बाळाची काळजी घेताना अभिनेत्रीची होते दमछाक, व्हिडीओद्वारे दाखवलं कसं असतं आयुष्य

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 15, 2024 | 11:03 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Sai Lokur shared glimpses of what a day is like with her baby through video

Video : असा असतो सई लोकूरचा दिवस, बाळाची काळजी घेताना अभिनेत्रीची होते दमछाक, व्हिडीओद्वारे दाखवलं कसं असतं आयुष्य

तान्ह्या बाळाची काळजी घेणे, त्याचे संगोपन करणे हे प्रत्येक आईसाठी तारेवरची कसरत असते. प्रत्येक आई आपल्या बाळाची काळजी घेत  त्याला हवी नको ती प्रत्येक गोष्ट पुरवण्यासाठी तिच्यापरीने सर्वतोपरी प्रयत्न करत असते. पण बाळाचे संगोपन करणे हे प्रत्येक आईसाठी एक वेगळा आनंदही असतो आणि प्रत्येक या प्रवासाचा आनंद घेत असते. असाच आनंद सध्या अभिनेत्री सई लोकुर घेत आहे.

‘बिग बॉस मराठी’ या रिअ‍ॅलिटी शोमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून सई लोकूरला ओळखले जाते. गेल्या काही दिवसांपासून सई ही तिच्या गरोदरपणामुळे चर्चेत आहे. सई लोकूर ही आई झाली आहे. सईने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. गेल्या वर्षी १७ डिसेंबर रोजी सईला कन्यारत्न प्राप्त झाले. अभिनेत्री आई झाल्यानंतर तिच्यावर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. सई ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे व तिच्या बाळाबरोबचे अनेक फोटो, व्हिडीओ शेअर करत असते.

View this post on Instagram

A post shared by Sai Lokur (@sai.lokur)

आणखी वाचा – मुंबई इंडियन्ससाठी वानखेडेला पोहोचली देशमुखांची सून, दोन्ही मुलांसह मनसोक्त एन्जॉय करताना दिसली अन्…; फोटो व्हायरल

अशातच तिने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने तिच्या दिवसाची सुरुवात कशी होते, इथपासून ते तिच्या बाळाला सांभाळण्यामध्ये तिचा दिवस कसा जातो ते तिच्या दिवसाचा शेवट कसा होतो? याची झलक पाहायला मिळत आहे. यामध्ये ती सकाळी उठून ब्रश करताना, त्यानंतर चहा-नाश्ता करताना, जेवताना बाळाबरोबर खेळताना, बाळाला फिरायला घेऊन जाताना, बाळाची मालिश करताना, त्यानंतर दिवसाच्या शेवटी रात्री बाळाबरोबर झोपतानाचे खास क्षण तिने शेअर केले आहेत. या व्हिडीओला तिने ‘तुझमे ही तुझमे डुबा रहें’ हे गाणं लावलं आहे.

आणखी वाचा – मेष व तूळ राशीच्या लोकांना नोकरीत मिळणार बढती, तर मीन व मिथुन राशीच्या लोकांची व्यवसायात होणार भरभराट, जाणून घ्या…  

या व्हिडीओमध्ये तिने दिवसाची संपूर्ण झलक पाहायला मिळत असून या व्हिडीओखाली तिने असं म्हटलं आहे की, “माझा दिवस कसा दिसतो यावर एक झटपट नजर टाका. ‘ताशी’ (सईची मुलगी) आता ४ महिन्यांची होणार आहे आणि तिची काळजी घेणे हे माझ्यासाठी महत्त्वाचे काम आहे. हे अक्षरशः ‘तुझमे दूबा रहे’ या गाण्यासारखेच आहे आणि दिवसभर मी हे एवढेच करते. माझ्या आयुष्यातील आई या एका व्यस्त टप्प्याचा मी सध्या पुरेपूर आनंद घेत आहे”.     

Tags: marathi actressmarathi entertainment newssai lokur
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Pooja sawant weekend post

लग्नानंतरचे दिवस एन्जॉय करत आहेत पूजा सावंत व सिद्धेश चव्हाण, ऑस्ट्रेलियामध्ये असं आयुष्य जगत आहे अभिनेत्री, आकाशपाळण्यात बसले अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.