कलाक्षेत्रात बरीचशी मंडळी अशी आहेत ज्यांचा सोशल मीडियावर बऱ्यापैकी वावर असतो. सोशल मीडियावर ही कलाकार मंडळी काही ना काही शेअर करत बरेचदा ट्रोलिंगचा सामना करतात. काही कलाकार या ट्रोलिंगला सडेतोड उत्तर देताना दिसतात तर काहीवेळा या ट्रोलर्सच्या कमेंटकडे दुर्लक्ष करतात. अशातच आता सुप्रसिद्ध गायक रोहित राऊत आणि गायिका जुईली जोगळेकर ट्रोलिंगच्या कचाट्यात अडकले आहेत. मात्र ट्रोलर्सच्या या ट्रोलिंगला जुईलीने सडेतोड उत्तर दिलेलं पाहायला मिळत आहे. (Juilee Jogalekar Answers To Trollers)
जुईली व रोहित यांनी गुढीपाडव्यनिमित्त खास एक सेल्फी शेअर केला आहे. जुईली व रोहितचा यावेळी पारंपरिक अंदाज लक्षवेधी ठरला. दरम्यान, जुईली व रोहित या फोटोमध्ये खूप आनंदी दिसत होते. या सध्या लूकवरुनही जुईलीलाला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. जुईलीचा हा फोटो पाहून नेटकऱ्यांनी तिला दातावरुन हिणवलं. या सगळ्यांना जुईलीने सडेतोड उत्तर देत सुनावलं.
नेटकऱ्याने ट्रोल करत या फोटोवर कमेंट केली की, “हा फोटो काढल्याबद्दल धन्यवाद. आमचा जग्गा जेवत नाही तेव्हा हा फोटो दाखवतो. मग भूत आला भूत आला अशा भीतीने जेवतो. पण जग्गा आमचा कुत्रा आहे”, असं तो म्हणाला. यावर उत्तर देत जुईली म्हणाली, “अरे वाह! अहो काल छुल्लू आला होता घरी. उगाच मध्ये काम करत असताना काहीतरी वायफळ बडबड करत होता. मी बोलले छुल्लूला गप बस म्हणून. पण तरी नाही ऐकलं. मग मी छुल्लूला झाडूनी मारून टाकलं. पण छुल्लू हे त्या झुरळाचं नाव होतं”, असं ती म्हणाली.

तर आणखी एका नेटकऱ्याने म्हटलं की, “मशेरी अजून लावताय?”, यावर जुईली म्हणाली, “नाही. संपली आहे. आणून देशील का जरा? आणि येताना स्वतःची अक्कल गहाण ठेवली आहेस ती ही आण हां”, असं म्हणाली. तर आणखी एका नेटकऱ्याने कमेंट करत, “म्हातारी आहे का ही?”, असं म्हटलं. यावर जुईली म्हणाली, “हो. काय सांगू तुम्हाला, काय गुडघे, सांधे दुखतात हो या वयात. कसं मॅनेज करता हो तुम्ही?”, असं म्हटलं.