रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

महेश मांजरेकर झाले गायक, स्वतःच दिग्दर्शित केलेल्या चित्रपटामध्ये गायलेलं गाणं प्रदर्शित, व्हिडीओ पाहून चाहत्यांकडूनही कौतुकाचा वर्षाव

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 12, 2024 | 2:39 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Mahesh Manjrekar sung a song in his movie Juna Furniture video viral on social media

महेश मांजरेकर झाले गायक, स्वतःच दिग्दर्शित केलेल्या चित्रपटामध्ये गायलेलं गाणं प्रदर्शित, व्हिडीओ पाहून चाहत्यांकडूनही कौतुकाचा वर्षाव

मराठी मनोरंजन सृष्टीतील एक लोकप्रिय नाव म्हणजे महेश मांजरेकर. महेश मांजरेकरांनी आजवर अनेक चित्रपटांचे यशस्वी दिग्दर्शन करत मराठी चित्रपटप्रेमींना अनेक चित्रपटांची मेजवानी दिली आहे. मराठीसह हिंदी व दाक्षिणात्य सिनेसृष्टीत त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. केवळ दिग्दर्शनचं नव्हे तर अनेक चित्रपटांत त्यांनी अभिनयही केला आहे.

मराठीसह हिंदी व दाक्षिणात्य भाषांतील अनेक चित्रपटांत त्यांनी दमदार भूमिका साकारत मनोरंजन केले आहे. त्यामुळे त्यांच्या दमदार अभिनयाचा मोठा चाहता वर्ग आहे. अशातच आता ते एका नवीन भूमिकेतून सर्वांसमोर येत आहेत. ते म्हणजे गायकाच्या… महेश मांजरेकर त्यांच्या आगामी ‘जुनं फर्निचर’ या चित्रपटातून गायकाच्या भूमिकेतून सर्वांच्या भेटीला येत आहेत.

View this post on Instagram

A post shared by जुनं फर्निचर (@skylinkentertainment)

महेश मांजरेकरांच्या ‘जुनं फर्निचर’मधील एक भावपूर्ण गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘काय चुकले सांग ना?’ असे या गाण्याचे बोल आहेत. हे गाणं वैभव जोशी यांनी शब्दबद्ध केले आहे.  तर डीएच हार्मोनी एसआरएम एलियन यांनी या गाण्याला संगीतबद्ध केले आहे आणि या गाण्याची विशेष गोष्ट म्हणजे या गाण्याला खुद्द महेश मांजरेकर यांचा आवाज लाभला आहे.

आणखी वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडणार गौरव मोरे?, हिंदी शोमध्ये अभिनेत्याची दमदार एन्ट्री, प्रेक्षक म्हणाले, “भाऊ तुम्ही हास्यजत्रा…”

या गाण्याबद्दल महेश मांजरेकरांनी आपल्या भावना व्यक्त करत असं म्हटलं आहे की, “या गाण्याच्या प्रत्येक शब्दांत अर्थ दडलेला असून हे गाणे मनाचा ठाव घेणारे आहे. हे गाणे मला गायला मिळाले, ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. मनातील घालमेल त्याचबरोबर मनाला मिळणारी उभारी अशा दोन्ही भावना या गाण्यात आहेत. चित्रपटाची कथा पुढे नेणाऱ्या या गाण्याला संगीत टीमही तितक्याच ताकदीची लाभली आहे.”

आणखी वाचा – सयाजी शिंदे यांच्या हृदयावर साताऱ्यामध्ये शस्त्रक्रिया, डॉक्टरांकडून मोठी माहिती, म्हणाले, “हृदयविकाराचा झटका येण्याआधीच…”

दरम्यान, ‘जुनं फर्निचर’ या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद व दिग्दर्शन महेश मांजरेकरांनी केले असून यात त्यांच्यासह मेधा मांजरेकर, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर, समीर धर्माधिकरी, डॉ. गिरीश ओक, विजय निकम, संतोष मिजगर, अलका परब, शरद पोंक्षे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Tags: mahesh manjrekarmarathi entertainment news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Maharashtrachi Hasyajtra Fame Gaurav More has participated in the Hindi comedy show Madness Machayenge

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सोडणार गौरव मोरे?, हिंदी शोमध्ये अभिनेत्याची दमदार एन्ट्री, प्रेक्षक म्हणाले, "भाऊ तुम्ही हास्यजत्रा..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.