सिनेसृष्टीत एकामागोमाग एक कलाकार मंडळी लग्न समारंभाच्या, साखरपुडा सोहळा उरकल्याच्या आनंदाच्या बातम्या चाहत्यांसह शेअर करताना दिसत आहेत. सिनेसृष्टीत लग्नाचे वारे वाहत असताना आता एका मराठमोळ्या अभिनेत्रीने दिलेल्या बातमीने साऱ्यांना धक्का बसला. काही वर्षांपूर्वी अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिचा शाही साखरपुडा समारंभ पार पडला होता. यानंतर आता अभिनेत्रीने साखरपुडा सोहळा मोडला असल्याची बातमी सोशल मीडियाद्वारे शेअर केली आहे. अभिनेत्रीने खास पोस्ट शेअर करत याबाबतची माहिती चाहत्यांसह शेअर केली. (Bhagyashree Mote On Her Engagement)
अभिनेत्री भाग्यश्री मोटेने मेकअप, डिझायनर विजय पालांडेसह साखरपुडा केला. त्यांच्या साखरपुड्याची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. कारण भाग्यश्री व विजय यांच्या साखरपुडा समारंभाला बॉलिवूड सुपरस्टार हृतिक रोशनने हजेरी लावली होती. हृतिक रोशनने त्याची गर्लफ्रेंड सबा आझादसह हजेरी लावली होती. त्यामुळे भाग्यश्रीच्या साखरपुडा सोहळ्याची खास चर्चा रंगलेली पाहायला मिळाली.
भाग्यश्री मोटे व विजय पालांडेचा साखरपुडा ९ ऑक्टोबरला पार पडला. विजय हा एक मेकअप आर्टिस्ट आहे. त्याने हृतिकचा चित्रपटातील लूकसाठी मेकअप केला आहे. विजय हा हृतिकचा मेकअप डिझायनर आहे. त्या दोघांमध्ये केवळ व्यावसायिक नाही, तर मैत्रीपूर्व नातं आहे. त्यांच्या साखरपुड्याला दीड वर्ष पूर्ण होताच आता भाग्यश्रीने साखरपुडा मोडला असल्याची बातमी खास पोस्ट शेअर करत दिली.
“नमस्कार मित्रांनो, एकमेकांसह राहण्याचा दीर्घकाळ प्रयत्न केल्यानंतर विजय आणि मी आमच्या वैयक्तिक व चांगल्या कारणांसाठी जोडीदार म्हणून वेगळे होत आहोत हे सांगण्यासाठी मी पोस्ट करत आहे. आम्ही चांगले मित्र राहू. कृपया आमच्या गोपनीयतेचा आदर करा. धन्यवाद”, असं म्हणत ती विजयपासून वेगळे होणार असल्याची माहिती तिने दिली आहे. भाग्यश्रीने ही पोस्ट विजयला टॅग केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते दोघे एकमेकांना डेट करत होते. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत भाग्यश्रीने तिच्या चाहत्यांना साखरपुडा केला असल्याची माहिती दिली होती. भाग्यश्री व विजय वेगळे होणार असल्याचं कळताच सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिलेल्या पाहायला मिळत आहेत.