रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सतत डायपर घालावे लागायचे, मृत्यूने दार ठोठावलं अन्…; सुप्रसिद्ध अभिनेत्याला मरण यातना, म्हणाला, “शेवटचा क्षण…”

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 6, 2024 | 6:05 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Anirudh Dave said he had to wear diapers during his Corona period

सतत डायपर घालावे लागायचे, मृत्यूने दार ठोठावलं अन्...; सुप्रसिद्ध अभिनेत्याला मरण यातना, म्हणाला, “शेवटचा क्षण...”

‘शक्ति: अस्तित्व के एहसास की’, ‘यारों का टशन’ आणि ‘पटियाला बेब्स’ यासारख्या मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर करणारा अभिनेता म्हणजे अनिरूद्ध दवे. नुकतंच त्याने अक्षय कुमारच्या ‘बेल बॉटम’सह अनेक चित्रपटामध्येही काम केले आहे. अभिनेता दोन वर्षांपूर्वी मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये वेब शोसाठी शूटिंग करत होता. त्यानंतर २३ एप्रिल २०२१ मध्ये त्याला कोरोनाची लागण झाली होती आणि जवळपास ५७ दिवस ते रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होते. याबद्दल त्यांनी नुकत्याच एका मुलाखतीत भाष्य केले  आहे.

अनिरुद्ध दवेने ‘दैनिक भास्कर’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याचे आयुष्य अधिकच बिकट झाले होते. भोपाळमध्ये शूटिंगदरम्यान त्याला कोरोना झाला होता. तेव्हा परिस्थिती इतकी बिकट होती की, त्याने जगण्याची आशाच सोडून दिली होती. यावेळी त्याची अवस्था एका लहान मुलासारखी झाली होती.

View this post on Instagram

A post shared by ANIRUDDH (@aniruddh_dave)

याबद्दल त्याने असं म्हटलं की, “मी रूग्णालयात असताना दररोज कोणालातरी शेवटचा श्वास घेत असताना आणि मरताना पाहत होतो. याचा माझ्यावर खूप गंभीर परिणाम होत होता. अशा परिस्थितीत मी स्वतःला शांत ठेवण्यासाठी पोटावर झोपण्याचा प्रयत्न करत असे. कुठलाही क्षण माझा शेवटचा क्षण असू शकतो हे सतत माझ्या मनात यायचं. माझं आयुष्य हे एका लहान मुलासारखं झालं होतं. माझ्या हातात सगळीकडे इंजेक्शन्स होती आणि त्यामुळे मला डायपर घालावे लागायचे. पण तेव्हा मी काहीच करु शकत नव्हतो”.

आणखी वाचा – पूर्वा शिंदे व किरण गायकवाडच्या लग्नाच्या चर्चा, अखेर अभिनेत्रीचं नात्यावर भाष्य, म्हणाली, “गुगलवर सर्च केलं तेव्हा…”

हे सर्व सांगताना अनिरुद्ध दवेला अश्रु अनावर झाले. यानंतर त्याने असं म्हटलं की, “हे माझे दुसरे आयुष्य आहे. त्यासाठी मी देवाचे आभार मानतो. तेव्हा माझ्यावरील उपचारासाठी माझ्या कुटुंबीयांना मोठे कर्ज काढावे लागले होते. पण त्या काळात इंडस्ट्रीतील काही लोकांनी मला मदत केली आणि त्या लोकांचा मी आभारी आहे.”

आणखी वाचा – Video : मित्रासाठी मंचावरच संजय मोनेंना रडू कोसळलं, उपस्थित कलाकारांच्याही डोळ्यात पाणी, म्हणाले, “४० वर्ष आम्ही एकत्र…”

दरम्यान, त्याच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर अनिरुद्ध दवेने २००८ साली ‘राजकुमार आर्यन’ या टीव्ही शोमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. अशातच आता लवकरच तो ‘चंदू चॅम्पियन’ या चित्रपटात दिसणार आहे, ज्यामध्ये कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट १४ जून २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.

Tags: Anirudh Davebollywood actorBollywood entertainment news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Paaru Serial Fan Moment

"आजी, मालिकाविश्व अन् प्रामाणिक मत", प्रसाद जवादेने शेअर केला 'पारू' मालिकेच्या चाहतीचा खास किस्सा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.