रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“त्याने दोन गोष्टी नाही केल्या तरी…”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं रोखठोक मत, म्हणाली, “हा फरक…”

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 5, 2024 | 11:16 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tujvin Sakhya Re fame Kadambari Kadam talked about equal responsibility of men and women see the details

“त्याने दोन गोष्टी नाही केल्या तरी...”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं रोखठोक मत, म्हणाली, “हा फरक...”

छोट्या पडद्यावरील ‘अवघाची हा संसार’ व ‘तुजविण सख्या रे’ या मालिकांनी प्रेक्षकांच्या मनात अक्षरश: घर केले. आज इतक्या वर्षांनीही या मालिकांची लोकप्रियता काही कमी झालेली नाही. या मालिकेच्या कथानकासह शीर्षकगीतांनी साऱ्यांनाच वेड लावले. याच मालिकांतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे कादंबरी कदम. ‘अवघाची हा संसार’ या मालिकेतून प्रसिद्धी मिळवलेल्या कादंबरीने काही वर्षांपूर्वी लग्न केले आणि मनोरंजन विश्वापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला.

कादंबरीची ‘तुजविण सख्या रे’ ही मालिका विशेष गाजली होती. यातील गाणी व कथानकाने प्रेक्षकांना वेड लावले होते. यानंतर कादंबरीने अनेक चित्रपटांमध्येही काम केले. मात्र गेल्या दहा वर्षांपासून तिने कोणत्याच शोमध्ये काम केले नाही. पण अभिनेत्री सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. अशातच तिच्या एका व्हिडीओने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. कादंबरीने नुकतीच ‘आरपार’ला मुलाखत दिली आणि या मुलाखतीचा एक व्हिडीओ तिने तिच्या सोशल मीडियाद्वारे शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Kadambari Kadam (@kadambarik13)

आणखी वाचा – “माझी पँटच मी घरी विसरलो अन्…”, मंचावर एन्ट्री करण्यापूर्वीच मृणाल कुलकर्णींच्या लेकाची तारांबळ, म्हणाला, “पँट घालत घालत…”

या व्हिडीओमध्ये तिने स्त्री-पुरुष समतेवर, त्याचबरोबर स्त्री व पुरुषांमधील काही विशिष्ट कामे व जबाबदारीवर भाष्य केले आहे. यात तिने असं म्हटलं की, “तो (नवरा) थकून आला आहे. त्यामुळे त्याने घरी दोन गोष्टी नाही केल्या तरी चालतात. तुम्ही जेव्हा वडील थकून घरी येतात तेव्हा मुलांना आपण सांगतो की, थांब बाबा आताच थकून आला आहे. त्यांना हातपाय धुवू दे, त्यांना फ्रेश होऊदे. पण आई थकून घरी आली की, आपण तिला असं म्हणतो की, तो (बाळ) तुझी सकाळपासून वाट बघत आहेत. हा फरक आहेच ना? त्याचं काय करायचं.”

आणखी वाचा – आजचे राशी भविष्य : आज शुभ योगामुळे ‘या’ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अगदी खास, मेष ते मीन राशीपैकी कुणावर असणार लक्ष्मीची देवीची कृपा?

यापुढे तिने असं म्हटलं आहे की, “मी त्यादिवशी ट्वींकल खन्ना कुणाची तरी मुलाखत घेत होती ती पाहिली. तेव्हा ती असं म्हणाली की, आपण आता पैसे कमावत आहोत. सगळं करत आहोत. पण तरी उद्या दुपारच्या जेवणात काय करायचं? हा प्रश्न आहेच आणि हा खूपच त्रासदायक प्रश्न आहे आणि याचं उत्तर मला नाही माहीत. म्हणजे आपल्याकडे स्वयंपाक करणारी बाईदेखील आपल्याला (महिलांनाच) हा प्रश्न विचारते की, “ताई आज जेवण काय करायचं?” म्हणा ना “दादा आज काय बनवायचं?” दरम्यान, कादंबरी ही सध्या ‘चारचौघी’ या नाटकातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.               

Tags: Kadambari Kadammarathi actressmarathi entertainment news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
narkar couple dance video

तरुणाईला लाजवेल असा नारकर कपलचा डान्स व्हिडीओ व्हायरल, ट्रोल नव्हे तर नेटकऱ्यांनी केलं भरभरुन कौतुक, दोघांची एनर्जी पाहून म्हणाले…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.