बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत ही सध्या तिच्या राजकारणातील प्रवेशामुळे चांगलीच चर्चेत आहे. लोकसभा २०२४ च्या उमेदवारांमध्ये कंगनाचे नाव समाविष्ट झाले आहे. त्यानंतर सर्वच स्तरामधून आश्चर्य व्यक्त केले. हिमाचल प्रदेशमधील मंडी या भागातून तिला तिकीट देण्यात आले आहे. त्यानंतर ती सक्रिय झालेली दिसून येत आहे. अनेक ठिकाणी ती सभेला उपस्थित असल्याचेही दिसून आले. लोकांचे विचार, मतं, वातावरण, आर्थिक स्थिति या मुद्यांवर ती सतत भाष्य करताना दिसते. अशातच तिचा जुना व्हिडीओ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. एका कार्यक्रमामध्ये उपस्थित असताना केलेल्या विधानामुळे तिच्यावर टीका होत आहे. (kangana ranaut on Prime minister )
‘टाइम्स नाऊ समिट’च्या दरम्यान कंगनाने केलेल्या विधानामुळे ती प्रचंड प्रमाणात ट्रोल होत आहे. तिने नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा उल्लेख स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून केला आहे. काही प्रमुख नेत्यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून त्यावर अनेक स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत.
Subhash Chandra Bose was the first Prime Minister of India : BJP candidate Kangana Ranaut.
— Roshan Rai (@RoshanKrRaii) April 4, 2024
IQ 🫡pic.twitter.com/v6VAekwz3F
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून सुभाष चंद्र बोस यांचा उल्लेख केल्याने नेटकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. कंगनाच्या नॉलेजबद्दल देखील प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले. अभिनेते प्रकाश राज यांनीदेखील व्हिडीओ शेअर करत लिहिले की, “सुप्रीम जोकर पार्टीचे जोकर…किती अपमान आहे…#जस्टटास्किंग”, असे लिहून कंगनावर टीका केली आहे.
त्यानंतर एका नेटकाऱ्याने लिहिले की, “जेव्हा आलिया भट्टने नॅशनल टेलिव्हीजनवर असे काही बोलली होती तेव्हा ती फक्त १९ वर्षाची होती. पण इथे तर ४० वर्षांची अंधभक्त. यांना एक पुरस्कार मिळाला पाहिजे”. दुसऱ्या नेटकाऱ्याने लिहिले की, “व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमधून डिग्री मिळवलेली”, त्यानंतर अजून एक नेटकरी म्हणतो की, “ही भाजपची उमेदवार आहे. हीला भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते हेदेखील माहीत नाही.
दरम्यान स्वतंत्र भारताचे भारताचे पहिले पंतप्रधान हे पंडित जवाहरलाल नेहरू होते. त्यांनी १९४७ साली भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. तसेच नेताजी सुभाषचंद्र बोसहे स्वातंत्र्य संग्रामातील एक प्रमुख नेते होते. तसेच त्यांनी भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेसच्या अध्यक्षांच्या रुपात कार्य केले आणि नंतर फॉरवर्ड ब्लॉकचे गठन केले. त्यामुळे कंगनाच्या ज्ञानाबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत.