शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘सातव्या मुलीची…’मध्ये विरोचकाचा शेवट नक्की कधी होणार?, ऐश्वर्या नारकरांनी आधीच सांगून टाकलं, म्हणाल्या, “त्रिनयना देवीबरोबचं युद्ध…”

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 2, 2024 | 9:00 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Aishwarya Narkar talked about when will the end of Satvya Mulichi Satavi Mulgi serial

'सातव्या मुलीची...'मध्ये विरोचकाचा शेवट नक्की कधी होणार?, ऐश्वर्या नारकरांनी आधीच सांगून टाकलं, म्हणाल्या, "त्रिनयना देवीबरोबचं युद्ध..."

एखादी नवीन मालिका सुरु झाली की तिला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळतो. मालिकेतील नव्या कथानकामुळे काही काळ ती मालिका प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करते. कथानक मनोरंजक असेल तर प्रेक्षक त्या मालिकेचा बराच काळ आस्वाद घेतात. मात्र कालांतराने टीआरपीमुळे निर्मात्यांकडून मालिकेच्या कथानकात बदल केले जातात. मालिकेच्या दृष्टीने हे बदल गरजेचे असले, तरी प्रेक्षक या बदलांमुळे काहीवेळेस नाराज असतात. त्यामुळे या नवीन बदलांमुळे नाराज होऊन प्रेक्षकांकडून मालिका बंद करण्याची मागणी केली जाते.

छोट्या पडद्यावरील अशीच एक लोकप्रिय मालिका म्हणजे झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका. या मालिकेला प्रेक्षकांनी आजवर चांगलाच प्रतिसाद दिला आहे. नुकतेच या मालिकेचे ५०० भाग पूर्ण झाले आणि याचनिमित्ताने सेटवर खास जंगी सलिब्रेशनही करण्यात आले. मात्र आता या मालिकेतील नवीन ट्विस्टमुळे ही मालिका बंद करण्यात यावी अशी प्रेक्षक प्रतिक्रिया येत आहे. यावर आता मालिकेतील एका मुख्य अभिनेत्रीने तिची प्रतिक्रिया दिली आहे.

आणखी वाचा – बायको गरोदर असतानाच बाहेर अफेअर, सत्य समजलं अन्…; सुप्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी म्हणालेली, “मला सगळं माहित असतानाही…”

अभिनेत्री ऐश्वर्या नारकार यांनी मालिकेच्या ५०० भागानिमित्त ‘इट्स मज्जा’बरोबर संवाद साधला. यावेळी ऐश्वर्या यांना विरोचकाचा शेवट कधी होणार असा प्रश्न विचारण्यात आला. याचे उत्तर देत त्यांनी असं म्हटलं की, “विरोचकाचा शेवट आणि मालिकेचा शेवट हा एकाच दिवशी होणार. विरोचक गेल्यानंतर मालिकेला अर्थ राहणार नाही. त्रिनयना व विरोचक यांच्यातील युद्ध हाच या मालिकेचा उद्देश आहे. त्यामुळे विरोचक संपेल तेव्हा मालिका संपेल.”

आणखी वाचा – बॅकस्टेजला काम करणाऱ्या मुलाने केलं लग्न, संकर्षण कऱ्हाडेला बायकोसह भेटायला आला अन्…; अभिनेता म्हणाला, “नाटकाच्या जीवावर संसार…”

दरम्यान, नुकताच या मालिकेचा एक नवीन प्रोमो शेअर करण्यात आला होता. यात नेत्रा-अद्वैत यांचा रोमान्स दाखवण्यात आला होता. तसेच या व्हिडिओद्वारे नेत्राला रुपालीचं सत्य समजलं आहे की काय? असाही प्रश्न विचारण्यात आला होता. त्यामुळे मालिकेला आता पुढे काय पहायला मिळणार? याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.        

Tags: aishwarya narkarmarathi actress
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Today 03 April 2024 panchang mesh to meen rashi bhavishya see the details

मेष, कन्या व कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आहे भाग्यशाली, कुणाच्या नशिबात काय असणार?, जाणून घ्या...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.