‘डबलसीट’, ‘फास्टर फेणे’, ‘धुरळा’ अशा आंनेक लोकप्रिय चित्रपटांच्या लेखनामुळे नावारुपाला आलेला लेखक म्हणजे क्षितिज पटवर्धन. आजवर त्याने अनेक लोकप्रिय मराठी चित्रपटांसाठी व चित्रपटांच्या गीतलेखनासाठी काम केले आहे. क्षितिजने आपल्या गाण्यांमधील ओळीने तसेच चित्रपटातील संवादाने मराठी प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. नाटक, चित्रपट, जाहिराती, कविता, गाणी अशा अनेक माध्यमात चौफेर लेखन करणारा लेखक क्षितिज आता लवकरच एका नवीन भूमिकेतून चाहत्यांच्या भेटीस येत आहे.
क्षितिज हा उत्तम लेखक असल्यामुळे तो अनेकदा सोशल मीडियाद्वारे त्याची मतं व्यक्त करत असतो. त्याच्या या व्यक्तव्यांना प्रेक्षकांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळतो. अशातच क्षितिजने त्याच्या सोशल मीडियाद्वारे शेअर केलेली एक पोस्ट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. ती म्हणजे त्याच्या आगामी बालनाट्याची. क्षितिजने शेअर केलेल्या या पोस्टद्वारे तो आता दिग्दर्शनात पाऊल टाकत असल्याचे समोर येत आहे.
क्षितिजने त्याच्या सोशल मीडियावर पहिल्या AI बालनाट्याची घोषणा केली आहे. ‘आज्जीबाई जोरात’ असं या बालनाट्याचे नाव असून याखाली “मनानं लहान असणाऱ्या प्रत्येकासाठी” असंही म्हटलं आहेल. दरम्यान, या बालनाट्याचे लेखन व दिग्दर्शन स्वत: क्षितिजने केले आहे. ही पोस्ट शेअर करत त्याने असं म्हटलं आहे की, “लेखक दिग्दर्शक म्हणून पहिलं AI महाबालनाट्य! आज्जीबाई जोरात! ३० एप्रिलपासून सगळ्या सुट्ट्या जोरात जाणार. ३० एप्रिलपासून लहान मोठे जोरात हसणार.”
गेले काही दिवस या ‘आज्जीयेतेय’ अशा आशयाच्या अनेक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत होत्या. तेव्हापासून ही आजीबाई नक्की कोण? याविषयी सर्वानाच उत्सुकता लागून राहिली होती. अशातच या नवीन बालनाट्याची घोषणा करणायात आली आहे. दरम्यान, क्षितिजने शेअर केलेल्या या पोस्टवर जितेंद्र जोशी, सुयश टिळक, रवी जाधव, आदित्य सरपोतदार, प्रियदर्शिनी इंदलकरसारख्या अनेक मराठी कलाकारांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.