रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“नशेत त्याला कसंही मारतात, इजा करतात अन्…”, जोगेश्वरीमधील कुत्र्याचे हाल पाहून भाऊ कदमांची लेक संतापली, म्हणाली, “त्याची रोजची फरपट…”

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 2, 2024 | 10:50 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bhau Kadam's daughter Mrunmayee shared a post and appealed for help the dog

"नशेत त्याला कसंही मारतात, इजा करतात अन्...", जोगेश्वरीमधील कुत्र्याचे हाल पाहून भाऊ कदमांची लेक संतापली, म्हणाली, "त्याची रोजची फरपट..."

मुक्या प्राण्यांवर अत्याचार होत असलेले पाहणे कोणालाच आवडत नाही. मुक्या प्राण्यांना नाहक त्रास देऊन त्यांची मज्जा घेणे ही विकृती गेले काही दिवस वाढली आहे. यावर अनेकदा अनेकांनी आवाजही उठवला आहे. काही दिवसांपूर्वी ठाण्यात मुक्या प्राण्यांच्या ग्रूमिंग सेशन सेंटरमध्ये कर्मचाऱ्याने एका श्वानाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. त्यानंतर नुकतेच एका आयपीएल सामन्यादरम्यान कुत्र्याला देण्यात आलेल्या अमानुष वागणुकीवर बॉलिवूडसह अनेक मराठी कलाकारांनी अवजा उठवला होता. अशातच आता आणखी एका पाळीव कुत्र्याबद्दल अभिनेते भाऊ कदम यांच्या मुलीने आवाज उठवला आहे.

‘चला हवा येऊ द्या’ या शो च्या माध्यमातून भाऊ कदम हे घराघरांत पोहोचले आहेत. या शोमुळे त्यांची लोकप्रियता प्रचंड  वाढली असून त्यांचा चाहतावर्गदेखील बराच मोठा आहे. भाऊ कदम यांची मुलगी मृण्मयीहीदेखील चांगलीच चर्चेत राहत असते. अशातच तिने शेअर केलेल्या एका पोस्टने तिने सर्वांचेलक्ष वेधून घेतले आहे. मृण्मयी ही प्रचंड प्राणी प्रेमी आहे. आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून ती बरेचदा प्राण्यांना लागणाऱ्या मदतीचे आवाहन तसेच प्राण्यांसाठीच्या पोस्ट शेअर करत असते. अशातच तिने नुकतेच एका पाळीव कुत्र्याबद्दल मदतीचे आवाहन केले आहे.

आणखी वाचा – आज ‘या’ राशीच्या लोकांना करिअर व व्यवसायात यश मिळू शकते, जाणून घ्या तुमचे आजच्या दिवसाचे राशी भविष्य

मृण्मयीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने असं म्हटलं आहे की, “समोरच्याला ‘एप्रिल फूल’ बनवून मजा घेणं ही आता विकृत सवय झाली आहे. जोगेश्वरीच्या मेघवाडी परिसरातल्या स्टफीसाठी ४ एप्रिलचा ‘World Stray Animals Day’ हाच खरा ‘एप्रिल फूल’चा दिवस ठरणार आहे. कुठल्यातरी नशेत काही माणसं या स्टफीला कसंही मारतात, त्याच्या अंगावर पाय देतात, शेपटीला इजा करतात आणि आता ‘हा कुत्रा चावतो’ अशी तक्रार गेल्यामुळे BMC ने त्याला उचलून नेलं आहे”.

आणखी वाचा – लग्नाआधी काजोलचे तोंडही बघायला तयार नव्हता अजय देवगण, अभिनेत्याने केलेला खुलासा, म्हणालेला, “खूप गर्विष्ठ आणि…”

यापुढे तिने “असं अचानक पकडून नेलेल्या निराधार, मुक्या स्टफीची रोजची फरफट आमच्या डोळ्यासमोर सुरु आहे. त्याला परत आणण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले. पण यात आम्हाला तुमचीसुद्धा मदत हवी आहे. ‘World Stray Animals Day’च्या आधी लवकरात लवकर जर याबद्दल आवाज नाही उठवला तर आम्ही त्याला कायमचं गमावून बसू. स्टफीला बोलता येत नाही, त्याचं म्हणणं आपण पोहोचवलंच पाहिजे. त्यामुळे प्रत्येकाने हे शेअर करा. आपल्याला त्याला वाचवायचं आहे” असं म्हणत त्याला मदत करण्याचे आवाहन केले आहे.

Tags: Bhau Kadam Daughtermarathi entertainment newsMrunmayee Kadam
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Rohit Sharma Hardik Pandya

वानखेडेवर हार्दिक पांड्या ट्रोल झालेला रोहित शर्माला बघवेना, मनाचा मोठेपणा दाखवत केलेल्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.