अभिनेत्री प्राजक्ता माळीने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात घर केलं आहे. तिने मालिका,चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये देखील काम केलं आहे. आता ती महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमध्ये सूत्रसंचालकाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर ही बऱ्यापैकी ती सक्रिय असते. प्राजक्ता नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. मात्र ती विशेष चर्चेत असते तिच्या फोटोशूटमुळे. प्राजक्ता तिचे नवनवीन फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिच्या सर्वच फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते.(prajakta mali)
पहा प्राजक्ताच खास फोटोशूट (prajakta mali)

आपल्या मनमोहक अदाकारीने प्राजक्ताने चाहत्यांच्या मनात घर केलेच आहे. नुकताच प्राजक्ताने एक साडीतील फोटोशूट इंस्टाग्रामवर पोस्ट करत चाहत्यांचा लक्ष वेधून घेतलं आहे.

या साडीतील फोटोत प्राजक्ताचा लूक सुंदर दिसत असून तिच्या नजरेने साऱ्यांनाच वेड केलं आहे.

लाल रंगाच्या साडीत प्राजक्ताच सौंदर्य अधिकच खुलून आलेलं दिसतंय. या फोटोंनी तर चाहत्यांना भुरळ घातली आहे.

प्राजक्ताने पोस्ट केलेल्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका युजरने, ताजं गुलाबाच फुल बघतोय समोर अस वाटतये.. ♥️???? अशी मजेशीर कमेंट केली आहे.(prajakta mali)

प्राजक्ता माळी अभिनेत्री तर आहेच मात्र ती व्यावसायिक सुद्धा आहे. तिने पारंपारिक दागिन्याचा व्यवसाय सुरू केला असून प्राजक्ताराज असं तिच्या व्यवसायाचं नाव आहे. विशेष म्हणजे तिच्या या दगिनाच्या व्यवसायाला देखील चाहत्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळतोय. यासोबत प्राजक्ता सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी कार्यक्रमात सूत्रसंचालन करताना दिसून येते.
====
====
याशिवाय प्राजक्ता माळी आता पोस्ट ऑफिस उघड आहे या मालिकेत दिसणार आहे. पारगाव मध्ये आता पूजा गायकवाड येणार आहे. दिसायला गोड,स्वभावाने कडक अशी हि पूजा पोस्टऑफिसमध्ये बेधडकपणे एन्ट्री करणार आणि पोस्टातील कर्मचाऱ्यांना मदत करणार. याचा एक प्रोमो देखील नुकताच समोर आला, यात प्राजक्ता हि सायकलवर एन्ट्री करताना पाहायला मिळत असून तिचा यात रेट्रो लूक देखील पाहायला मिळतोय.
