‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत प्राजक्ताने लोकप्रियता मिळवली आहे. वाह दादा वा या तिच्या टॅगलाईनची तर सर्वत्र चर्चा रंगलेली असते. प्राजक्ताने आजवर तिच्या अभिनय कारकीर्दीत खूप यश मिळवलं आहे. अभिनय, नृत्याची आवड जोपासणाऱ्या प्राजक्ताने ही आवड जोपासत प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. इतकंच नव्हे तर प्राजक्तांने मालिका विश्वातूनही तिच्या अभिनयाची छाप सोडत प्रेक्षकांची मन जिंकली आहे. (Prajakta Mali Niece Video)
प्राजक्ताच सौंदर्य तर प्रत्येक तरुणाईला भुरळ घालत असत. खूप मोठा चाहता वर्ग असलेल्या या प्राजक्ताचा सोशल मीडियावर ही बऱ्यापैकी वावर आहे. नेहमीच काही ना काही ती शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. इंस्टाग्राम अकाउंटवरूनही ती हटके फोटोशूट शेअर करताना दिसते. इतकंच नव्हे तर ती तिच्या कुटुंबाबरोबरचे ही व्हिडीओ, फोटो नेहमी शेअर करत असते. विशेषतः प्राजक्ता तिच्या दोन गोड भाचीचे व्हिडीओ नेहमी शेअर करताना दिसते.

प्राजक्ताप्रमाणे तिच्या दोन गोड भाची ही प्रेक्षकांच्या लाडक्या आहेत, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. अशातच प्राजक्तांने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरुन शेअर केलेल्या एका व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतले आहे. प्राजक्ताच्या दोन्ही भाची या तिला भेटण्यासाठी तिच्या सेटवर आल्या असल्याचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतेय. घरी जशा दोघी धिंगाणा करत असतात तशाच त्या सेटवर जाऊनही धिंगाणा करत असल्याचं तिने या व्हिडीओमधून शेअर केल्याचं पाहायला मिळत आहे.
हा व्हिडीओ शेअर करत प्राजक्तांने कॅप्शन देत असे म्हटले आहे की, “जेव्हा तुमच्या भाची तुम्हाला भेटायला सेटवर येतात, उच्छाद, जो इथे दिसत नाही आहे”, असं म्हटलं आहे. प्राजक्ता व तिच्या भाचीच खास बॉण्डिंग नेहमीच पाहायला मिळतं. आत्याचं शेपूट असं देखील प्राजक्ताच्या भाचींना म्हटलं जातं. नेहमीच त्या प्राजक्ताच्या अवतीभोवती घिरट्या घालताना दिसतात. प्राजक्ताचंही तिच्या भाचीवर खूप प्रेम आहे.