शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“लोकांना जाड व बारीक यापलीकडे काहीच दिसेना”, शारीरिक रचनेवरुन सई लोकूरला सतत हिणावत आहेत लोक, अभिनेत्री भडकली, म्हणाली, “एखाद्या आईने…”

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 30, 2024 | 7:16 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Sai Lokur reacts to body trolling after her pregnancy said its such a shame see the details

“लोकांना जाड व बारीक यापलीकडे काहीच दिसेना”, शारीरिक रचनेवरुन सई लोकूरला सतत हिणावत आहेत लोक, अभिनेत्री भडकली, म्हणाली, “एखाद्या आईने...”

मराठी सिनेसृष्टीतील असे बरेचसे कलाकार आहेत जे नेटकऱ्यांकडून सतत ट्रोल होत असतात. मात्र ही कलाकार मंडळी या ट्रोलिंगला न घाबरता प्रेक्षकांना सडेतोड उत्तर देताना दिसतात. यांपैकी एक अभिनेत्री म्हणजे सई लोकूर. ‘बिग बॉस मराठी’ या रिअ‍ॅलिटी शोमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून सई लोकूरला ओळखले जाते. गेल्या काही दिवसांपासून सई ही तिच्या गरोदरपणामुळे चर्चेत आहे. सई लोकूर ही आई झाली आहे. सईने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. गेल्या वर्षी १७ डिसेंबर रोजी सईला कन्यारत्न प्राप्त झाले.

अभिनेत्री आई झाल्यानंतर तिच्यावर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. पण यादरम्यान अभिनेत्रीला तिच्या शारीरिक बदलांवरुन काही लोकांनी वाईट प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावर सईने आता सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत उत्तर दिलं आहे. सईने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने असं म्हटलं आहे की, “महिलांना गरोदरपणानंतर स्वतःची व बाळाची काळजी घेण्यासाठी साधारणपणे ६ महिन्यांची प्रसूती रजा मिळते. पण मी ३ महिन्यांतच माझ्या कामाला सुरुवात केली. एक इन्फ्युएन्सर म्हणून मी काही उत्पादनांचा प्रचार करण्यासाठी व या उत्पादनांच्या जाहिरातींचे शूटिंग करत आहे”.

आणखी वाचा – सावत्र मुलीबरोबर असं आहे दिया मिर्झाचं नातं, फोटो शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांकडूनही कौतुक, म्हणाले, “स्वतःची आईही असं…”

यापुढे गरोदरपणानंतरच्या शाररीक रचनेवरुन होणाऱ्या टिकेबद्दल असं म्हटलं आहे की, “एखाद्या नव्याने आई झालेल्या स्त्रियांच्या प्रयत्नांचे कौतुक करण्याऐवजी लोक कशावर टीका करतात तर तिच्या वाढलेल्या शरीराबद्दल? आणि ही खूपच लाजिरवाणी गोष्ट आहे. एकमेकांबरोबर पुढे जाण्याऐवजी आपण इतरांना खाली खेचत आहोत”. तसेच यापुढे तिने “लोकांना जाड आणि बारीक यापलीकडे काही दिसतंच नाही का?, आपण नक्की कोणत्या समाजात राहत आहोत?”. असा प्रश्नही उपस्थित केला आहे.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने पॅरिसमध्ये सेलिब्रेट केला बायकोचा वाढदिवस, रोमँटिक फोटो समोर, म्हणाला, “सोनू…”

दरम्यान, सईने आतापर्यंत अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केले आहे. सईने ‘पारंबी’, ‘नो एन्ट्री पुढे धोका आहे’, ‘कीस किसको प्यार करु’, ‘जरब’, ‘मी आणि यू’ या चित्रपटात काम केले आहे. त्याबरोबर सई ही बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.

Tags: marathi actressmarathi entertainment newssai lokur
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
solar eclipse will be on April 8 be special? Know the reason

यंदाचे सूर्यग्रहण का असणार आहे खास?, 'हे' सूर्यग्रहण चुकले तर तब्बल वीस वर्षे वाट पाहावी लागणार? जाणून घ्या…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.