शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

कार्तिकी गायकवाडच्या गरोदरपणाची बातमी कळताच मुग्धा वैशंपायनचा आनंद गगनात मावेना, डोहाळे जेवणाचे फोटो पाहून म्हणाली, “खूप आनंदी…”

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 29, 2024 | 8:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Mugdha Vaishampayan, Priyanka Barve, Sharyu Date and fans have wished Kartiki Gaikwad for her pregnancy.

कार्तिकी गायकवाडच्या गरोदरपणाची बातमी कळताच मुग्धा वैशंपायनचा आनंद गगनात मावेना, डोहाळे जेवणाचे फोटो पाहून म्हणाली, "खूप आनंदी..."कार्तिकी गायकवाडच्या गरोदरपणाची बातमी कळताच मुग्धा वैशंपायनचा आनंद गगनात मावेना, डोहाळे जेवणाचे फोटो पाहून म्हणाली, "खूप आनंदी..."

झी मराठी वाहिनीवरील ‘सारेगमप लिटिल चॅम्प’ या कार्यक्रमाची लोकप्रियता ही सर्वश्रुत आहे. याच कार्यक्रमामुळे नावारुपाला आलेली गायिका म्हणून कार्तिकी गायकवाडला ओळखले जाते. या कार्यक्रमाची विजेती गायिका कार्तिकी ही तिच्या आवाजाने कायमच चर्चेत असते. त्याचबरोबर ती सोशल मीडियावरही तितकीच चर्चेत असते. आपल्या आवाजाने कायमच चर्चेत राहणारी कार्तिकी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

कार्तिकी ही लवकरच आई होणार असून तिने तिच्या ओटीभरणाच्या खास कार्यक्रमाचे फोटो शेअर केले आहेत. पारंपरिक पद्धतीनं कार्तिकीचं डोहाळ जेवण करण्यात आले. या डोहाळे जेवणाचे काही खास फोटो तिने नुकतेच तिच्या सोशल मीडियाद्वारे शेअर केले आहेत. या फोटोमध्ये कार्तिकीचे आई-वडील, सासू-सासरे व तिचे दोन भाऊ दिसत आहेत. “ओटीभरण कार्यक्रमातील काही खास क्षण” असं म्हणत तिने हे फोटो शेअर केले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Kartiki Kalyanji Gaikwad – Pise (@kartiki_kalyanji_gaikwad9)

आणखी वाचा – “मला नट म्हणून हिणवतात आणि…”, गोविंदाचा शिवसेनेत प्रवेश होताच अमोल कोल्हेंची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका, म्हणाले, “आपल्या सहकाऱ्यांना…”

कार्तिकी आई होणार असल्याची खुशखबर समोर येताच चाहत्यांसह मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. गायिका प्रियंका बर्वे, शरयू दाते, शमिका भिडे, मालविका दीक्षित यांच्यासह अभिनेत्री अनुष्का सरकटे व प्राजक्ता गायकवाड यांनीही कमेंट्सद्वारे कार्तिकीचे कौतुक केले आहे. तसेच कार्तिकीची मैत्रीण व गायिका मुग्धा वैशंपायननेदेखील “खूप खूप आनंदी आहे” असं म्हणत कार्तिकीला अभिनंदन म्हणत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

आणखी वाचा – कार्तिकी गायकवाडने गरोदरपणामध्ये पहिल्यांदाच शेअर केली पोस्ट, डोहाळे जेवणाच्या संपूर्ण कार्यक्रमाचीही दाखवली झलक, म्हणाली, “खास क्षण…”

‘सारेगमप लिटल चॅम्प्स’च्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेल्या कार्तिकीचा मोठा चाहतावर्ग आहे. कार्तिकीने आपल्या सुरांनी चाहत्यांना मंत्रमुग्ध केलं आहे. ‘सारेगमप लिटल चॅम्प्स’मधील कार्तिकीचं ‘घागर घेऊन’ हे गाणं खूपच लोकप्रिय झालं होतं. कार्तिकी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. अशातच तिने शेअर केलेले हे फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

Tags: kartiki gaikwadmugdha vaishampayanPriyanka BarveSharyu Date
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Today 30 march 2024 panchang mesh to meen rashi bhavishya see the details

आजचे राशी भविष्य : आज 'या' राशीच्या लोकांवर होणार शनिदेवाची कृपा, कुणाच्या भाग्यात नेमकं काय?, जाणून घ्या...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.