रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

नवऱ्यासह ऑस्ट्रेलियामध्येच राहत आहे पूजा सावंत, असं जगत आहे आयुष्य, बायकोसाठी सिद्धेशने बनवला पुलाव, म्हणाली, “माझ्या नवऱ्याने…”

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 28, 2024 | 1:34 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Pooja Sawant's husband has given her a special treat on the occasion of her one month wedding anniversary

नवऱ्यासह ऑस्ट्रेलियामध्येच राहत आहे पूजा सावंत, असं जगत आहे आयुष्य, बायकोसाठी सिद्धेशने बनवला पुलाव, म्हणाली, "माझ्या नवऱ्याने..."

मराठी मनोरंजन सृष्टीतली ‘कलरफूल’ अभिनेत्री पूजा सावंत ही नुकतीच विवाहबंधनात अडकली. आपल्या सहजसुंदर अभिनयाने, निरागस हास्याने व मनमोहक सौंदर्याने पूजाने अनेकांच्या हृदयात आपले स्थान निर्माण केले. ‘मन धागा धागा जोडते नवा’ म्हणत पूजाने मराठीसह हिंदी सिनेविश्वातदेखील तिच्या अभिनयाची छाप सोडली आहे. आपल्या अभिनयाने व हटके स्टाईलमुळे चर्चेत राहणारी पूजा तिच्या लग्नामुळे चांगलीच चर्चेत आली. २८ फेब्रुवारी रोजी पूजाने सिद्धेश चव्हाणसह लग्नगाठ बांधली असून आज त्यांच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला आहे.

यानिमित्ताने पूजाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पूजा व सिद्धेशचा खास लूक पाहायला मिळाला. तसेच वरमाला घालतानाचा खास क्षणही पाहायला मिळाले. यावेळी पूजाची बहीण व आई भावुक झालेली ही पाहायला मिळाली. पूजाने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये लग्नातील शाही थाटमाट डोळे दिपवणारा होता.  “मी काल रात्री पाहिलेल्या सर्वात सुंदर स्वप्नातून जाग आल्यासारखं वाटत आहे. लग्नाला एक महिना झाला यावर विश्वास बसत नाही” असं म्हणत तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

आणखी वाचा – Video : “मोदींची काय पूजा करु?”, मराठी बायकांचा नरेंद्र मोदींवर राग, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने शेअर केला व्हिडीओ

तर लग्नाला एक महिना पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पूजाच्या नवऱ्याने तिच्यासाठी खास पदार्थ बनवत या खास दिवसाचे सेलिब्रेशन केले आहे. पूजाच्या नवऱ्याने बायकोसाठी खास पुलाव भात केला असल्याचे पाहायला मिळत आहे. पूजाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर या खास पदार्थाचा फोटो शेअर केला असून तिने नवऱ्याचे कौतुक केले आहे. “लग्नाला एक महिना पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नवऱ्याने दिलेली खास ट्रीट” असं म्हणत तिने पुलाव भाताचा फोटो शेअर केला आहे.

आणखी वाचा – Video : रवी जाधव यांच्या कोकणातल्या गावी शिमग्याला अशी नाचवतात पालखी, अंगणातील व्हिडीओ केला शेअर, म्हणाले, “गावची पालखी…”

दरम्यान, पूजा सावंत ही लग्नानंतर परदेशात आपल्या नवऱ्यासह गेली असून ती लग्नानंतरच्या खास क्षणांचा अनुभव घेत आहे. नुकतेच तिने होळीचे खास सेलिब्रेशनही केले असल्याचे पाहायला मिळाले. त्यांच्या या होळी सेलिब्रेशनचे खास फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाले.  

Tags: marathi actressmarathi entertainment newspooja sawant
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Prathamesh Parab On Reels

"एकांकिकेची जागा रीलने घेतली अन्…", प्रथमेश परबने शेअर केलेली पोस्ट चर्चेत, म्हणाला, "रंगमंच जगेल…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.