‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून अभिनेत्री विशाखा सुभेदार घराघरांत पोहोचली. सध्या विशाखा या ‘शुभविवाह’ या मालिकेत नकारात्मक भूमिकेत पाहायला मिळत आहेत. काल विशाखा सुभेदार यांचा वाढदिवस झाला. वाढदिवसानिमित्त त्यांना अनेकांनी शुभेच्छाही दिल्या. दरम्यान विशाखासाठी तिच्या लेकाने म्हणजेच अभिनय सुभेदारने केलेली खास पोस्ट साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.अभिनयने आईबरोबरचे काही खास क्षण इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करत खास कॅप्शन देत पोस्ट शेअर केली आहे. यावेळी त्याने शेअर केलेल्या फोटोंमागील किस्सेही सांगितले आहेत. (vishakha subhedar son post)
अभिनयने आईला शुभेच्छा देत असं म्हटलं की, “दिवसभर काम करुन घरी आलो की ही बाई घरी असल्यावर बेडवरच बसून तुला जेवण गरम करुन देऊ का माऊ? अशी एक गोड हाक मारते. त्याक्षणी वाटतं की घरी आलो आहे. आहे त्याच कपड्यात बेडरूमच्या दारापाशी उभं राहून २० एक मिनिट तरी गप्पा होतात आणि मग मी माझं जेवण गरम करून जेवायला बसतो. पहिला घास घेतल्याच क्षणी आई गं असा सुस्करा सुटतो. आणि इथेच २ मिटरवर बसलेली आई आठवते. कधीच हट्ट नाही की. तू इथेच बस बोल आणि जेव. तू तुला हव तसं खा. तुझा वेळ आहे हा. तुझी स्पेस आहे, असं म्हणत स्वतः सुद्धा काहीतरी बघत झोपून जाते. पुन्हा सकाळी उठलो की आई -आई सुरु. माझ्या आयुष्यात तुझं नाव घेणं संपतच नाही. अशा या माझ्या गोंडस, वेड्या, खुळ्या, एंटरटेनमेंटला हॅपी बर्थडे”.

पुढे तो असंही म्हणाला, “मी हे सगळे फोटो या खास दिवसासाठी का निवडले ते थोडक्यात सांगतो. पहिला व दुसरा फोटो शूटवरुन दमून-भागून घरी आल्यावर माझी इच्छा आहे म्हणून कैफेला गेलेलो आम्ही. शूटवरून दमून घरी जाताना आम्ही. कामावरून आल्यावर नुसतं मित्रांना दहा मिनिटे भेटायला मी नाटकं करतो, आणि फक्त मी म्हणतोय म्हणून १४ तासाची शिफ्ट तेही एकाचवेळी २ मालिकांचं चित्रिकरण करून आल्यावर मला बाहेर घेऊन गेलेली आई, प्रेम फक्त”.
यापुढे त्याने लिहिलं आहे की, “मी एकटा हट्ट करत नाही तर अजून एक आई जी आली की हट्ट करते. आली की अंगावर उड्यामार, बाहेर चल अशी हट्ट करणारी आमचं बाळ स्टेला. तिला भेटायच म्हणून शूटवरुन अंबरनाथला येणारी आई. फक्त ओढ. चौथा फोटो, मला खरंच या गोडव्याबद्दल काय बोलावं सुचत नाही. गोडवा फक्त. पाचवा फोटो, खळीपासून केसांपर्यंत एकसारखे आम्ही. वेंधळे आम्ही. कॉपी फक्त. सहावा फोटो, सकाळ-सकाळ डोळे सुद्धा उघडलेले नसताना असा चेहरा दिसला आणि मी थांबवूच शकलो नाही माझ हसू. हसू नकोस रे आईवर असं म्हणत माझ्या जोकरने मला तेव्हा जे हसवलं ते अजुनही मी यावर रोज हसतो. वेडी फक्त”, असं म्हणत खास पोस्ट शेअर केली आहे.