अभिनेता देवदत्त नागे याने सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. त्याने या पोस्टद्वारे त्याच्या वडिलांचे निधन झाल्याची माहिती दिली आहे. देवदत्त नागे यांचे वडिल गजानन रामचंद्र नागे यांचे ११ मार्च रोजी दु:खद निधन झाले आहे. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.(devdatta nage)
पहा देवदत्त नागे याने पोस्टमध्ये काय लिहिलं (devdatta nage)
देवदत्त नागे याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी पोस्ट करत याबाबतची माहिती दिली. या पोस्टमध्ये त्याने त्याच्या वडिलांचा फोटो पोस्ट केला असून त्याने फोटोखाली आभार पोस्ट व्यक्त केली आहे. यात त्याने लिहिलंय की, आमच्या कुटुंबासाठी या कठीण काळात सहानुभूती व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही दिलेल्या शोकसंवेदना आणि पाठिंब्याबद्दल आम्ही खरोखरच आभारी आहोत. आणि हे सार माझ्या कुटुंबाच्या नेहमी लक्षात राहील. असे म्हणत त्याने वडिलांच्या निधनानंतर खंबीरपणे उभे राहणाऱ्या वा आधार देणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानले आहेत.(devdatta nage)

====
हे देखील वाचा – स्टार प्रवाहच्या कलाकारांनी उभारली मनोरंजनाची गुढी
====
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता देवदत्त नागे सध्या कलर्स मराठी वाहिनीवरील ‘जीव माझा गुंतला’ मालिकेत काम करत आहे. मालिकेत देवदत्तची नकारात्मक भूमिका असून त्यानं प्रेक्षकांच्या मनात अल्पावधीतच स्वतःचं स्थान निर्माण केलं. तर झी मराठी वाहिनीवरील ‘जय मल्हार’ या मालिकेमुळे देवदत्त नागे ला खारट अर्थाने लोकप्रियता मिळाली. या मालिकेत त्याने खंडेरायाची भूमिका साकारली होती. आजही प्रेक्षक देवदत्तला भगवान खंडेराय म्हणूनच ओळखतात.
