मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या शर्मा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. रिॲलिटी शो ‘बिग बॉस १७’ मुळे ही अभिनेत्री अलीकडे चर्चेत होती. याशिवाय ऐश्वर्या एका वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आलेली पाहायला मिळत आहे. ‘डान्स दिवाने ४’च्या मंचावर ऐश्वर्याला चक्कर आल्याने, अनेकांनी ती गरोदर असल्याच्या अफवा पसरवल्या होत्या. मात्र, आता खुद्द ऐश्वर्यानेच या अफवांवर मौन सोडले आहे आणि या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. (Aishwarya Sharma On Pregnancy)
ऐश्वर्या शर्मा भट्ट ‘गम है किसी के प्यार में’ मालिकेच्या सेटवर नील भट्टला भेटली. त्यानंतर दोघे प्रेमात पडले आणि २०२१ मध्ये त्यांनी लग्न केले. ३० नोव्हेंबर रोजी उज्जैनमध्ये त्यांचे लग्न झाले. ही जोडी ‘बिग बॉस १७’ मध्ये एकत्र पाहायला मिळाली होती. या कार्यक्रमात ऐश्वर्याच्या वागण्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले होते. नीलबरोबरचे तिचे वागणे प्रेक्षकांना विशेष आवडले नाही. त्यामुळे अनेकदा अभिनेत्री ट्रोलिंगच्या कचाट्यात सापडली. अशातच ‘डान्स दिवाने’ हा कार्यक्रम संपला असून कलाकारांनी त्यांच्या नव्या कामाला सुरुवात केली आहे. दरम्यान, या सेटवरुन ऐश्वर्या बेशुद्ध झाल्याची बातमी समोर आली. तेव्हापासून अभिनेत्रींच्या प्रेग्नन्सीच्या चर्चांना उधाण आलेलं पाहायला मिळालं.

अखेर आता अभिनेत्रीने यावर स्पष्टीकरण दिले आहे. ३१ वर्षीय ऐश्वर्याने इंस्टाग्राम अकाउंटवरुन पोस्ट शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे. “मी तिसऱ्यांदा ओरडून सांगत आहे कारण मी सततच्या मॅसेजला कंटाळले आहे. कोणतेही निष्कर्ष काढणे थांबवा, मी एक माणूस आहे आणि कधीकधी माझाही रक्तदाब कमी होतो आणि तुमच्या माहितीसाठी माझा बीपी ६०-८० होता. त्यामुळे मी सेटवर बेशुद्ध पडले. मी गरोदर नाही. आता ही अफवा थांबवा”, असं म्हणत तिने पोस्ट शेअर केली आहे.
ऐश्वर्या आणि निलच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, नील आणि ऐश्वर्या डान्स शो ‘डान्स दीवाने ४’ मध्ये दिसले होते. याशिवाय ही जोडी सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ते काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतात. शिवाय ही जोडी अनेक रील व्हिडीओ बनवतानाही दिसते.