‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक आहे. संपूर्ण जगभरात या कार्यक्रमाने प्रेक्षकांना वेड लावलं आहे. या कार्यक्रमातील कलाकारांचेही लाखो चाहते दिवाने आहेत. महाराष्ट्राबरोबरच हा कार्यक्रम सध्या संपूर्ण जगभरात प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात व्यस्त आहे. हास्यजत्रेचे कलाकार सध्या परदेश दौरे करण्यात व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वीच ही कलाकार मंडळी सिंगापूर दौऱ्याहून परतली. तेथून येताच त्यांनी लगेचच ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. आता ही कलाकार मंडळी ऑस्ट्रेलिया दौरा करून भारतात परतली आहेत. (Vanita Kharat And Sumit Londhe)
या कार्यक्रमातील कलाकारांनी त्यांच्या अभिनयाने कार्यक्रमाची उंची वाढवली आहे. या कार्यक्रमात प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन कर्णरारी अभिनेत्री वनिता खरात नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. वनिताने कोळीवाड्याची रेखा अशी स्वतःची ओळख बनवली असून ही ओळख तिने जगभरात पोहोचवली आहे. वनिताने तिच्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. वनिता खरात गेल्या वर्षी लग्नबंधात अडकली. गेल्या वर्षी २ फेब्रुवारी रोजी वनिताने तिचा बॉयफ्रेंड सुमित लोंढेशी लग्नगाठ बांधली. मोजक्या नातेवाईक व मित्रपरिवाराच्या उपस्थितीत दोघांचा लग्नसोहळा पार पडला.
वनिता व सुमित नेहमीच एकमेकांसाठी काही ना काही शेअर करत असतात. अशातच बायको ऑस्ट्रेलियाहून परतताच सुमित वनिताला एअरपोर्टवर घ्यायला गेलेला एक व्हिडीओ त्याने शेअर केला आहे. वनिता सुमितला पाहून गोड स्माईल देताना दिसत आहे. तसेच बायकोसाठी सुमितने खास मेजवानीचा बेतही केलेला पाहायला मिळाला. सुमितने वनिताला स्वतःच्या हाताने खास जेवण केलं. मासे भाजतानाचा एक व्हिडीओही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता.

वनिता व सुमित यांचं खास बॉण्डिंग नेहमीच प्रेक्षकांना आवडतं. दोघांच्या एकत्र फोटोशूटच्या फोटोंवरही चाहते भरभरुन कमेंट करत त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसतात. विशेषतः सुमित बरेचदा त्याची बायको वनिताची काळजी घेताना दिसतो. दोघांची जोडी चाहत्यांची लाडकी जोडी आहे.