बऱ्याच दिवसांनंतर प्रियांका चोप्रा मुंबई एअरपोर्टवर स्पॉट होताना दिसली. यावेळी प्रियांका एकटी स्पॉट झाली नाही तर तिच्याबरोबर तिची लेक मालतीही स्पॉट झाली. प्रियांका व मालती यांचे पापाराजीला पोज देतानाच अनेक व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. प्रियांका तिच्या मुंबईतील माहेरच्या घरी परतली आहे. ही त्यांची मोस्ट अवेटेड ट्रिप मानली जात आहे. कारण यावेळी प्रियांका एकटी नसून ती तिची मुलगी मालतीबरोबर पोहोचली आहे. (Priyanka Chopra With Daughter)
प्रियांका भारतात काही खास कामासाठी आली आहे की आपल्या कुटुंबासह वेळ घालवण्यासाठी आली आहे, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. याआधी जेव्हा प्रियांका इथे आली होती तेव्हा ती तिची मुलगी मालतीला निक जोनासबरोबर परदेशात सोडून एकटीच मुंबईत आली होती. काही दिवसांपूर्वी जोनास ब्रदर्स त्यांच्या कॉन्सर्टसाठी मुंबईत आले होते, पण त्या वेळी प्रियांका त्यांच्याबरोबर आली नव्हती. इतकेच नाही तर जामनगरमध्ये नुकत्याच झालेल्या अनंत अंबानी व राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंगलाही प्रियांका उपस्थित राहू शकली नाही. तेव्हा तिची आई मधु चोप्रा म्हणाली होती की, प्रियांका तिच्या कामात व्यस्त आहे पण ती अनंत व राधिकाच्या लग्नाला नक्की हजेरी लावणार आहे.
प्रियांका चोप्रा तिची बहीण परिणिती चोप्राच्या लग्नालाही उपस्थित राहू शकली नाही आणि तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन तिच्या बहिणीचे अभिनंदन केले. यानंतर आता नुकतेच १२ मार्च रोजी तिची चुलत बहीण मीरा चोप्राचे लग्न झाले आणि या प्रसंगीही प्रियांका उपस्थित राहू शकली नाही, तर तिची आई मधू यांनी या लग्नाला हजर राहिली होती.
प्रियांका मुंबई विमानतळावर स्पॉट झाली तेव्हा ती काळ्या ट्राउजरसह काळ्या रंगाच्या टॉपमध्ये छान दिसत होती. तर मालतीने हिरव्या रंगाचा प्रिंटेड ड्रेस परिधान केला होता. प्रियांकाने विमानतळावर पोहोचल्यावर पापाराझींना हसत पोज दिल्या. तर चिमुकली मालती कधी हसताना तर कधी घाबरलेली दिसली. दोघीही मायलेकींच्या क्युट लुकला पापराजींनी त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केलं.