पापाराझी व जया बच्चन यांच्यात कोणत्या प्रकारचे नाते आहे हे आता जवळपास सर्वांनाच माहीत आहे. जया बच्चन व पापराझी हे शब्द ऐकले किंवा वाचले तरी डोळ्यासमोर जया बच्चन यांचा रागीट चेहरा आणि पापाराझींचा मॅडम एक फोटो अशी विनंती करतानाचे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. फार क्वचित प्रसंगीच जया बच्चन पापाराझींवर रागावल्या नसतील. नाहीतर त्या दरवेळेस पापाराझींना फोटोसाठी कायम नकारच देत असतात. त्यांच्या या कृतीचे काही जण समर्थन करत त्यांना पाठिंबा देतात, मात्र काहीजण त्यांच्या या कृतीवर टीकाही करतात.
अशातच आता जया बच्चन पापाराझींना देत असलेल्या वागणुकीवर नेटकऱ्यांसह मौसमी चटर्जींनी त्यांची खिल्ली उडवली आहे. मौसमी चॅटर्जींना नुकतीच एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. तेव्हा मौसमी यांनी काही पोज देत फोटो कढले. मात्र काही वेळाने त्या चिडल्या. तेव्हा कुणीतरी त्यांची तुलना जया बच्चन यांच्याशी केली. यावर “मी जया बच्चन यांच्यासारखी नाही” असं म्हणत मौसमी चटर्जींनी त्याला उत्तर दिले. यापुढे त्या “ मी त्यांच्यापेक्षा खूप चांगली आहे. लक्षात ठेवा. जर तुम्ही नसता तर आम्ही तरी कुठे असतो?” असंही म्हणाल्या.
जया बच्चन व मौसमी चॅटर्जी एकमेकांच्या कट्टर प्रतिस्पर्धी असल्याची माहिती आहे. एका मुलाखतीत मौसमी चटर्जींनी गुलजार यांच्या ‘कोशिश’ या चित्रपटात जया बच्चन यांनी त्यांची जागा कशी घेतली होती याचा खुलासा केला होता. या चित्रपटासाठी मौसमी यांनी तीन दिवस शूटिंगही केल्याचे मौसमी यांनी सांगितले होते. पण जया बच्चन यांची सेक्रेटरी सकाळपासून रात्रीपर्यंत चित्रपटाच्या सेटवरच असल्याचे त्यांनी पाहिले आणि मग अचानक एके दिवशी गुलजारांनी चित्रपटात मौसमी चॅटर्जी यांच्याऐवजी जया बच्चन यांना घेतले.
आणखी वाचा – आजचे राशीभविष्य : कर्क ते कुंभपैकी कोणाचं नशिब आज उजळणार?, कोणाला मिळणार अधिक धन?, जाणून घ्या तुमचं भविष्य
तसेच दोघांच्या सध्याच्या कारकिर्दीबद्दल सांगायचे तर, जया बच्चन अजूनही चित्रपटांमध्ये काम करत आहेत. गेल्या वर्षात आलेल्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात त्या दिसल्या होत्या. पण मौसमी चॅटर्जी २०१३ पासून चित्रपट व अभिनयक्षेत्रापासून दूर आहेत. मात्र, २०२३ मध्ये ती ‘इंडियाज बेस्ट डान्सर-३’ या डान्स रिॲलिटी शोमध्ये पाहुण्या म्हणून आल्या होत्या.