मालिकाविश्वातील एका लोकप्रिय कपलची नेहमीच चर्चा सुरु असते. विशेषतः सोशल मीडियावर ही जोडी चर्चेत असते. ही जोडी म्हणजे दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम. या लोकप्रिय जोडीचा २२ फेब्रुवारी २०१८ मध्ये शाही विवाहसोहळा संपन्न झाला. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटोस सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. तसेच, लग्नाच्या पाच वर्षानंतर या जोडप्याने २१ जून २०२३ रोजी त्यांच्या लहानग्यांचे म्हणजेच रुहानचे स्वागत केले. दीपिका-शोएब आपल्या मुलांबरोबरचे सुंदर फोटो नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असतात. (Dipika Kakkar Troll)
अशातच दीपिका व शोएब आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. काल रात्री दीपिका तिचा पती शोएबबरोबर एका पंजाबी चित्रपटाच्या प्रीमियरला पोहोचली होती. कार्यक्रमात शोएब काळ्या रंगाच्या टी-शर्ट व ग्रे जीन्समध्ये खूपच उठून दिसला. तर दीपिका निळ्या रंगाच्या अनारकली सूटमध्ये खूपच सुंदर दिसत होती. यावेळी तिने केस मोकळे ठेवत हेअरस्टाईल केली होती आणि कमीतकमी मेकअप करुन तिचा लूक पूर्ण केला.
दीपिका व शोएब यांचे समोर आलेले फोटो पाहून नेटकऱ्यांनी दीपिकाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. समोर आलेल्या व्हिडीओखली कमेंट करत एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, “इतकं वजन वाढलं आहे, थोडं लक्ष द्या”, तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, “तू पुन्हा प्रेग्नंट आहेस का?”. तर आणखी एका युजरने कमेंट करत लिहिलं आहे की, “दीपिका फक्त तिच्या सासरची सेवा करण्यात व्यस्त आहे”. मात्र, काही चाहत्यांनी या जोडप्याचे कौतुक करत त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.
या कार्यक्रमातील दीपिका व शोएब यांचे फोटो, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्री पुन्हा गरोदर असल्याच्या अफवा पसरल्या आहेत. मात्र, फोटोंमध्ये अभिनेत्रीचे वजन खूप वाढलेले दिसत आहे. या अफवांवर अद्याप दीपिका वा शोएबने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.