शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“आम्ही गुपचुप लग्न…”, आदिल खानबरोबरच्या नात्याबद्दल सोमी खानची प्रतिक्रिया, म्हणाली, “नकारात्मकता, वाद…”

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 10, 2024 | 11:44 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Somi khan talked about her intimate wedding with rakhi sawant ex husaband adil khan durrani

“आम्ही गुपचुप लग्न...”, आदिल खानबरोबरच्या नात्याबद्दल सोमी खानची प्रतिक्रिया, म्हणाली, “नकारात्मकता, वाद...”

राखी सावंतचा पूर्वाश्रमीचा पती आदिल खानने नुकतेच ‘बिग बॉस १२’ फेम सोमी खानशी लग्न केले आहे. सोमीच्या होम टाऊन जयपूरमध्ये दोघांचे लग्न झाले आणि त्यानंतर दोघेही त्यांच्या रिसेप्शनसाठी बेंगळुरूला गेले. त्यांच्या या लग्नामुळे सोशल मीडियावर सध्या अनेक चर्चा होत आहेत. अशातच सोमी खानने तिच्या आदिल खान दुर्रानीबरोबरच्या नात्यावर भाष्य केले आहे. एका मुलाखतीत सोमीने त्यांच्या नात्याबद्दल व त्यांच्या नात्यावर कुटुंबियांची नेमकी काय प्रतिक्रिया होती, याबद्दल सांगितले.

यावेळी सोमी खानने असं म्हटलं की, “आमचे लग्न ३ मार्चला झाले होते, आम्ही शूटिंगदरम्यान भेटलो होतो. पण त्याआधी आम्ही एका अवॉर्ड शोमध्ये पहिल्यांदा भेटलो आणि आम्ही एकमेकांना ओळखून आता ७ महिने झाले आहेत. आम्ही सुरुवातीला मित्र झालो आणि नंतर आमच्यात एकमेकांबद्दल प्रेमभावना निर्माण झाली आणि मग आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला”.

View this post on Instagram

A post shared by Adil Khan Durrani (@iamadilkhandurrani)

आदिलबरोबर लग्न करण्याबाबत सोमी म्हणाली, “आम्ही आमचे लग्न लपवले नाही. आम्हाला लग्न करायचं होतं, पण ते खाजगी ठेवायचं होतं. आम्हाला कोणतीही नकारात्मकता, वाद किंवा प्रसिद्धीचा स्टंट नको होता. आम्हाला ते फक्त आमच्या कुटुंबापुरतेच मर्यादीत ठेवायचे होते. त्यामुळे आमच्या पालकांनी लग्नाचा दिवस निश्चित केला आणि त्या दिवशी आमचे लग्न झाले”.

आणखी वाचा – ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटाला नकार दिल्यामुळे ‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्यावर टाकण्यात आला बहिष्कार, स्वत:च खुलासा करत म्हणाला…

यापुढे सोमी आदिलबरोबरच्या तिच्या नात्याबद्दल असं म्हणाली की, “मला आदिलचा भूतकाळ माहीत आहे. पण आता आम्ही दोघेही आमच्या आयुष्याच्या एका नव्या प्रवासाला निघालो आहोत. त्यामुळे मला मागे वळून बघायचे नाही. तो त्याचा भूतकाळ होता आणि तो आता संपला आहे. मला आदिलचा भूतकाळ बघायचा नसून मी फक्त आदिलबरोबर माझे भविष्य पाहत आहे”.

आणखी वाचा – आजचे राशीभविष्य : ‘या’ राशीच्या लोकांसाथी आजचा दिवस ठरणार वरदान, धनप्राप्ती व नोकरीत बढतीचाही आहे योग, जाणून घ्या…

दरम्यान, सध्या सोशल मीडियावर आदिल खान व सोमी खानच्या लगाच्या फोटोंनी धुमाकूळ घातला आहे. काही काळापूर्वी दोघांनी दुबईत एक म्युझिक व्हिडीओ शूट केला होता, तेव्हापासून त्यांच्यात जवळीक वाढली आणि अखेर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 

Tags: Adil Khan DurraniBollywood Entertainment Newsसोमी खानbollywood newsentertainment newsRakhi Sawant ex Husabandsomi khanआदिल खान दूर्राणीबॉलीवूड बातमीबॉलीवूड मनोरंजन बातमीमनोरंजन बातमीराखी सावंत पूर्वाश्रमीचा पती
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Hina Khan Wedding
Entertainment

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी कामावर परतली हिना खान, अगदी सिंपल लूकमध्ये दिसली, एकटी दिसताच नेटकरी म्हणाले, “नवरदेव कुठे आहे?”

जून 6, 2025 | 10:30 am
javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Next Post
Kiran karmarkar talked about propaganda films he said There is nothing like that in this article 370

“गोष्टी वाढवून सांगितल्या...”, ‘प्रचारकी’ चित्रपटांबद्दल किरण करमरकरांनी मांडलं स्पष्ट मत, म्हणाले, “त्या दोघांबद्दल...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.