श्रीमंती, महागड्या गाड्या, अनेक उद्योग धंदे आणि याच बरोबर मन मिळावू स्वभावासाठी ओळखलं जाणारं कुटुंब म्हणजे अंबानी कुटुंब. सतत अनेक गोष्टींसाठी चर्चेत चर्चेत असलेलं अंबानी कुटुंब पुनः एकदा चर्चेत आलं आहे ते म्हणजे अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग सोहळ्यामुळे. जाम नगर येथे अनंत-राधिका यांच्या प्री वेडिंग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला बॉलीवूड, हॉलिवूड सहपरदेशातील प्रसिद्ध पाहुण्यांनीं देखील हजेरी लावली होती. या सोहळ्याला अनेक कलाकारांनी सुंदर डान्स, गाणे यांचे सादरीकरण केले. त्याचे अनेक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. या कार्यक्रमातील सर्वात जास्त चर्चेत राहिलेली घटना म्हणजे बॉलीवूडमधील तीन खान यांनी एकत्र सादर केलेला डान्स परफॉर्मन्स. (Bollywood Celebrities at Anant Ambani Wedding)
या कार्यक्रमातील आणखी एका गोष्टीची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे ते म्हणजे अनेक कलाकारांनीं अनंत राधिका यांना दिलेल्या भेटवस्तू.
रणबीर-आलिया
बॉलीवूडमधील लोकप्रिय कपल रणबीर-आलिया यांनी राहासह अनंत-राधिकाच्या प्री वेडिंगला हजेरी लावली आणि राधिकासाठी आलियाने हिऱ्यांनी सजवलेली खास पर्स गिफ्ट दिल्याची माहिती समोर आली आहे.

सलमान खान (Bollywood Celebrities at Anant Ambani Wedding)
अनंत- राधिका यांच्या प्री वेडिंगला चर्चा रंगली ती म्हणजे दबंग अभिनेता सलमान खानच्या डान्सची. सलमाने ने केलेल्या डान्ससह सलमानने अनंत-राधिकासाठी घेऊन गेलेल्या खास गिफ्टची ही चांगलीच चर्चा रंगली. सलमानने अनंताला खास कस्टमाईज केलेलं घड्याळ आणि राधिकासाठी डायमंडचे ईयर रिंग्स गिफ्ट केले.

शाहरुख खान
किंग खान म्हणून लोकप्रिय असलेल्या शाह रुख खानने अनंत-राधिकाला तब्बल ५ करोड रुपयाची महागडी स्पोर्ट्स कार गिफ्ट म्हणून दिली आहे अशी सर्वत्र चर्चा रंगली आहे.

रणवीर-दीपिका
बॉलीवूडमधील क्युट कपल म्हणून नेहमी चर्चेत असलेल्या रणवीर-दीपिका यांनी अनंत-राधिकाला एक महागडं कपल थीम असलेलं घड्याळ गिफ्ट दिलं असल्याचं बोललं जातंय.

सिद्धार्थ-कियारा
अभिनेत्री कियारा आडवाणीचं आंबानी कुटुंबाबरोबर एक खास नातं आहे. कियारा ही अनंत अंबानी ची बहीण ईशा अंबानींची लहानपणीपासूनची मैत्रीण असल्याचं समोर आलं आहे. सिद्धार्थ-किनाराने अनंत-राधिकाला गणपती आणि लक्ष्मीची रत्नजडित मूर्ती दिल्याचं बोललं जात आहे. (Bollywood Celebrities at Anant Ambani Wedding)
